💥खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत महत्तवपुर्ण बैठकीचे आयोजन...!💥सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे- रवि कांदे 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  यशश्री: निवासस्थानी महत्तवपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याबैठकीस भाजपा तालुक्यातील. सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणी रवि कांदे यांनी केले आहे.

     रविवार, दि. 23  फेब्रुवारी रोजी सकाळी १० .३० वाजता यशःश्री निवास्थान येथे या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे. विविध प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलन संदर्भात महत्तावपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
         तरी या महत्तवपुर्ण बैठकीला परळी तालुक्यातील भाजपच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, चेअरमन, सरपंच, उपसरपंच, सभापती सर्व शासकीय समित्यांचे पदाधिकारी, सर्व बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणी रवि कांदे यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या