💥पुर्णा पोलीस स्थानकात जनसामान्यांना भासतेय कर्तव्यदक्ष अधिकारी आणी कर्मचाऱ्यांची उणीव..!💥जनसामान्यांच्या मनावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे पोलीस अधिकारी पुन्हा शहराला लाभतील काय ?💥

पुर्णा/'गाव तसे चांगले पण राजकीय वरदहस्त प्राप्त अवैध व्यवसाईक तस्कर माफियांनी वेशीला टांगले' अशी अवस्था शहरासह संपूर्ण तालुक्यात झाल्याचे दिसत असून हत्या हत्येचा प्रयत्न,अल्पवयीन मुलींवर बलात्कार बलात्काराचे प्रयत्न,अल्पवयीन मुली व शाळकरी मुलींची छेडछाड,धाडसी चोऱ्या,दरोडे,अवैध धंद्यांतून आपल्या वर्चस्वाचा लढा देऊन प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी,वृत्तपत्र प्रतिनिधी जनसामान्यांवर प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या निर्माण झालेल्या टोळ्या,किरकोळ कारणांमुळे होणारे वाद आणी या वादातून गुंडांमध्ये होणारा शसस्त्र संघर्ष वेळोवेळी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन जनसामान्यांत वेळोवेळी प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण करत असतांना तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले व पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर गभीर प्रश्नचिन्ह निर्माण करीत असुन शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यस्थेला राजकीय वरदहस्त प्राप्त गुंड माफियाशाही वेळोवेळी आवाहन देत असतांना या आवाहनाला पोलीस प्रशासनातून सडेतोड जवाब देणारा व घडलेल्या भयंकर गुन्ह्यांचा मुळा पर्यंत तपास लावण्याची क्षमता असलेला एकही कर्तव्यकठोर अधिकारी तालुक्यात सद्यातरी नसल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढतांना पाहावयास मिळत आहे.

पुर्णा पोलीस स्थानकात अगदी काही दिवसापुर्वीच सहा.पो.उप.नि.पदावर कार्यरत पोलीस अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आपल्या कर्तव्यकठोर भुमिकेतून गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रचंड दबदबा निर्माण करीत अनेक गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास लावत पिडीतांना न्याय मिळवून दिल्याचे उल्लेखनीय कार्य केले होते परंतु त्यांच्या झालेल्या बदलीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोके वर काढतांना दिसत आहे.सार्वत्रिक निवडणूका असो वा कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीची किंवा कोणत्याही धर्माची धार्मिक मिरवणूक कुठलाही वादविवाद होता कामा नये याकरिता त्यांचे विशेष प्रयत्न असायचे गुन्हेगारांवर त्यांनी प्रचंड दबदबा निर्माण केला होता.

पुर्णेतील संपूर्ण मराठवाडा परिसरात गाजलेल्या बहु चर्चित गुटखा प्रकरणा मध्ये फौजदार पवार यांनी मोठी कारवाई करून तब्बल 22 लाखाचा गुटखा पकडला अणि परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई केली, या गुटखा प्रकराच्या मुळा पर्यंत तपास करीत त्यांनी 20 पेक्षा जास्त गुटखा माफियांची कठोरपणे चौकशी केली त्यापैकी 07 लोकांना आरोपी केले परंतु या अवैध गुटखा प्रकराचा तपास करतेवेळी अनेकांचे धाबे दणाणले अवैध गुटखा माफियांच्या हितचिंतक तत्वभ्रष्ट पुढाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करीत तपासाची दिशा बदलण्यासाठी दबाव तंत्राचा वापरही करण्याचा प्रयत्नही केल्याचे निदर्शनास आले परंतु संबंधित तपास अधिकारी पवार व त्यांचे पथक दबावाला किंवा आरोप प्रत्यारोपांना बळी पडत नसल्याने अवैध गुटखा प्रकरणाचा तपास त्यांच्या कडून काढून वरिष्ठ अधिकारी असलेल्या पोलीस निरीक्षकांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते,पुढे या प्रकरणा मध्ये एकही आरोपी अटक करण्यात आला नाही,या अवैध गुटखा प्रकरणाचा तपास फौजदार पवार यांच्याकडे असतांना ज्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयतही जामीन मिळाले नाही त्याच अवैध गुटखा प्रकरणात तपास अधिकारी बदलताच मात्र हळुवारपणे एक एक अवैध गुटखा माफियांना जामीन मिळण्यास सुरुवात झाली.या अवैध गुटखा प्रकरणात आरोपींना सहज जामीन मिळावा याकरिताच तर तपास थंड बसत्यात टाकण्याच्याच उद्देशाने तर तपास अधिकारी बदलण्यात आला नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 पूर्णा पोलीस स्थानकात फौजदार चंद्रकांत पवार हे कर्तव्यावर असतांना  शहरासह तालुक्यात एकाही चोरट्या रेतीची तस्करी करणाऱ्या अवैध रेती माफियाची उघडपणे अवैध रेती वाहतूक करणारा टिपर चालविण्याची हिम्मत नव्हती आत्ता तर शहरासह तालुक्यात राजरोस पणे रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक होतांना दिसत आहे.पुर्णाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर अत्यंत कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांमध्ये काही मोजक्याच अधिकाऱ्यांची नावे लक्षात राहण्या सारखी असून त्यामधे, पो.नि.राजेंद्र सिंह गौर,स्व.पो.नि.शंकरजी सिटीकर,पो.नि.रामराव गाडेकर,पो.नि.विकास पाटील,आयपीएस अधिकारी योगेश कुमारजी,डिवायएसपी ए.जी.खान,आणी पिएसआय.चंद्रकांत पवार यांनी आपल्या कारकिर्दीत अत्यंत उल्लेखनिय कार्य करुन जनसामान्यांच्या मनावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
पुर्णा पोलीस स्थानकाला आजच्या परिस्थितीत अत्यंत कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली असून जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यकठोर व कर्तव्यदक्ष जिल्हा पोली अधिक्षक कृष्णकांतजी उपाध्याय यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी जनसामान्यांतून होतांना दिसत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या