💥मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज वादात सापडले होते💥
मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी अखेर आठ दिवसानंतर लेखी माफीनामा दिला आहे. माझ्या 'त्या' विधानाचा मीडियानं विपर्यास केला आहे. तरीसुद्धा कोणाचं मन दुखावलं गेल्यास मी माफी मागतो,असं निवृत्ती इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मानसन्मान असलेला तमाम महिला वर्गाची ही माफी मागतो.आज गत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरूपी सेवेतील ह्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन, अंधश्रद्धा मिटवून विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्याकीर्तनरुपी सेवेतील या वाक्यानं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा, असंही इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत...
0 टिप्पण्या