💥पुर्णेतील जुना मोंढा परिसरात मद्यपीने अश्लील शिवीगाळ करीत युवकास ढकलून दिले ..!💥पोलीस स्थानकात मद्यपी आरोपी विरोधात गुन्हा दाखल💥

पुर्णा/शहरातील जुना मोंढा परिसरात भरलेल्या हजरत मस्तानशाह वली ऊरुसात दारुच्या नशेत तर्राट झालेल्या एका मद्यपीने घुडदूस घालत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत एका २१ वर्षीय युवकास धक्काबूक्की करीत ढकलून दिल्याची घटना आज शनिवार दि.२९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२-४० वाजेच्या सुमारास घडली असून या घटने संदर्भात फिर्यादी युवकाने दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात हजरत मस्तानशाह दर्ग्याच्या ऊरुसास सुरुवात झाली असून जुना मोंढा परिसरात भरलेल्या ऊरुसात गेलेल्या मोहंमद तालेब मो.गालीब वय वर्षे २१ या तरुणास दारुच्या नशेत असलेल्या आरोपी अमजद कुरेशी याने विनाकारण अश्लील भाषेत शिवीगाळ करीत ढकलून दिले या प्रकरणी फिर्यादी मोहंमद तालेब याने दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी अमजद कुरेशी याच्या विरोधात गुरनं.८८/२०२० कलम २९४,३२३ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
-------------------------------------------------------------
💥पुर्णा शहरात मद्यपींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त💥


शहरातील लोकमान्य टिळक रोड,डॉ.आंबेडकर रोड महाविर नगर,जुना मोंढा,बसस्थानक रोड,रेल्वे स्थानक परिसर या उच्चभ्रू वसाहतींमध्ये परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानांसह बिअरबार तर आहेतच या शिवाय यातील काही भागांमध्ये बेकायदेशीररित्या अवैध देशी-विदेशी दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शहरातील या उच्चभ्रू वसाहतींमध्ये मद्यपी सातत्याने घुडदूस घालतांना दिसत असून या परिसरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिकांना तसेच परिसरातून वावरणाऱ्या महिला-शाळकरी मुलींना त्रास देतांना दिसत असून अश्लील भाषेत शिविगाळ करणे धमकावत मद्य प्राशन करण्यास पैशाची मागणी करणे महिला-मुलींची छेडछाड करणे असे प्रकार सातत्याने होतांना दिसत असून या गंभीर प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मद्यपींची हिंमत कमालीची वाढल्याचे दिसत असून नागरिकांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे...
-------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या