💥वाशिम पोलिस विभागाची कर्तव्यतत्परता,अवघ्या ४ तासात शोधली ६ मुले...!💥वाशिम जिल्ह्यात सर्वत्र होत आहे पोलिस प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक💥

फुलचंद भगत

वाशिम-पोलिसांच्या कामगिरिवर तसेच धिम्यागतीने चालत असलेल्या तपासकामांबद्दल अनेकजन तोंडसुख घेत असतात तर तशा बहुदा बातम्याही वाचन्यात येतात परंतु पोलिसही कर्तव्यतत्परता दाखवुन आपली भुमिका निभावत असल्याचे वाशिम जिल्ह्यात केलेल्या तपासकामांवरुन पोलिसांना सॅलुटही केल्याबिगर राहवत नाही.सविस्तर वृत्त असे की, ता २८ फेब्रुवारी रोजी ठाणेदार शिवाजी लष्करे हे पोलीस ठाणे आसेगाव येथे हजर असतांना सायंकाळी ७ . ३० वा सुमारास फोनव्दारे माहीती मिळाली की , शिवणी दलेलपुर येथील यात्रेतुन ६ मुले हरविले आहेत . ठाणेदार लष्करे यांनी सदर बाबींची तात्काळ माहीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली पोलीस अधिक्षक ,वसंत परदेशी व अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात मुलांचा शोध सुरू केला . ठाणेदार लष्करे व त्यांचे पथक विनाविलंब शिवणी दलेलपुर यात्रेत रवाना होऊन हरविलेल्या मुलांबाबत माहीती घेतली असता राजु सुदामा गुप्ता नावाचा इसम उत्तर प्रदेश येथील राहणारा असुन तो यात्रेमध्ये पाळणा / झुला लावून आपली व कुंटुबाची उपजिवीका चालवितो . राजु गुप्ता यांची पत्नी मरण पावली असुन त्यांना १ ) सोनू राज गुप्ता , वय १४ वर्ष ,पुजा राजु गुप्ता , वय १० वर्ष , दुर्गा राजु गुप्ता , वय ०७ वर्ष ४, राधीका राजु गुप्ता , वय ०४ वर्ष अशा ४ मुली व ,दादु राजु गुप्ता , वय ०३ वर्ष ,रूद्र राजु गुप्ता , वय ११ महीने असे मुले असुन राजु गुप्ता हा दारू पिण्याच्या सवईचा असुन मुलांना त्रास देतो . वडीलांची सदर बाब मोठी मुलगी सोनु गुप्ता यांना न आवडल्यामुळे राग मनात धरून ती उर्वरीत ५ भावंडासह कोणालाही न सांगता निघुन गेली . मिळालेल्या माहीतीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांचे आदेशाने दोन पथक तयार करून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच ठाणेदार लष्करे यांनी आपआपले वाशिम जिल्हयात व लगतच्या जिल्हयात नेटवर्क वापरून निघुन गेलेल्या मुलांची माहीती घेण्याचा प्रयत्न केला . तसेच राजु गुप्ता यास बारकाईने विचारपुस केली असता राजु गुप्ता यांनी माहीती दिली की , आम्ही वेगवेगळया जिल्हयातील यात्रेमध्ये जावून झुला / पाळणा यात्रेत लावुन आलेल्या कमाईवर उदरनिर्वाह करतो . काही दिवसापूर्वी आम्ही रिसोड , मेहकर भागात वास्तव्यास होतो सदर माहीती वरून ठाणेदार आसेगांव यांनी आपले १ पथक रिसोड मेहकर भागात रवाना केले . तसेच ठाणेदार यांनी या भागातील आपले खबरी यांना वरील मुलांबाबत माहीती सांगुन माहीती घेतली असता खबऱ्याकडुन माहीती मिळाली की , मेहकर येथे सोनु गुप्ता हीची मैत्रीण राहत असुन तिच्या वडीलांचे नाव महादेव साबळे आहे . त्यांचे कडे ५ / ६ मुले आले असुन ते मेहकर येथुन बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत . क्षणाचाही विलंब न करता ठाणेदार लष्करे यांनी पोउपनि किशोर खंडारे व त्यांचे पथक माहीती मिळाल्या प्रमाणे मेहकर येथे पाठवून वरील६मुले ताब्यात घेतले व पोलीस ठाणे आसेगांव येथे आनून मुलांचे वडील राज गुप्ता यांचे ताब्यात दिले . चार तासात मुलांचा शोध लावणाऱ्या पथकाचा सर्वत्र कौतुक होत आहे.पोलिसांनी सतर्कतेने आणी कर्तव्यतत्परतेने केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस विभागही निश्चितच कौतुकास पाञ आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या