💥तहसिल कार्यालया समोर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले आंदोलन💥
पुर्णा/येथील तहसिल कार्यालया समोर आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११-०० ते ०३-०० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या धोरणां विरोधात शेतकरी हितांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
पुर्णा तालुका व शहर भाजपच्या वतीने येथील तहसिल कार्यालया समोर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भाजपा परभणी जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,तालुकाध्यक्ष अनंत पारवे,
सभापति बालाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष डॉ.अजयसिंह ठाकूर बळीराम कदम,भाजपा नेते तथा मा.तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बाळूभाऊ कदम,पूर्णा चे संचालक रामकिसन रवंदले,विजय कराड,हनुमान अग्रवाल,भारत एकलारे,प्रशांत कापसे,आनंद बनसोडे,दाजीबा भोसले,चंद्रकांत टाकलकर,दादाराव चापके,नवनाथ वाघमारे,राजू धूत,संजय अमभुरे,विलास कदम,बालाजी कदम,विश्व्नाथ होलकर,विजय साखरे,देवानाद वलसे,मनोहर शहाणे,माउली कदम,मुंजा कदम,आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शहरासह ग्रामीण भागातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0 टिप्पण्या