💥१ एप्रिल' ठरवणार राज्य सरकारचं भवितव्य..? - प्रकाश आंबेडकर💥अजीतन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या ५ बातम्या💥

एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मात्र या निर्णयावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. तर प्रकाश आंबेडकरांनीही एनआयएकडे तपास देणे चुकीचा आहे. देशद्रोहाच्या कारवाई केल्या असं कुठेही नाही, हे प्रकरण फ्रॉड आहे हे बोलण्याची हिंमत हवी होती असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात, गृहमंत्री शिफारस करतात, गृहमंत्र्यांनी आपलं मत फाईलवर नोंदवलं पण मुख्यमंत्र्यांनी अधिकार वापरत हा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बोलणी झाली असं दिसतं नाही, गृहमंत्र्यांचे वेगळं मत, मुख्यमंत्र्यांचे वेगळं मतं होतं. एल्गारचा तपास एनआयएकडे वर्ग करु नये असं गृहमंत्र्याचं मत होतं तर मुख्यमत्र्यांनी हा तपास एनआयएला देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कुठेतरी मैत्रीत बेबनाव आल्याचं दिसतं असं त्यांनी सांगितले.तसेच पूर्वीपासून हे प्रकरण फसवणुकीचं होतं. आम्हाला विचारात घेतलं नाही असं सांगत उद्धव ठाकरे मागच्या शासनातून बाहेर पडले, त्यांना सिद्ध करण्याची संधी आली होती. वारंवार डावलण्यात आलं असा आरोप शिवसेनेने केला होता पण ती सिद्ध करण्याची संधी गमावली. या संधीचा उपयोग त्यांनी केला असता तर शिवसेनेचं वेगळं अस्तित्व दिसलं असतं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच १ एप्रिल महाराष्ट्राच्या शासनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे, १ एप्रिलपासून एनआरपी लागू होणार आहे. त्याबाबत सुद्धाराज्य सरकारची स्पष्ट भूमिकानाही, अंमलबजावणी करण्यात तिन्ही पक्षाचं एकमत असेल तर सरकार टीकतं. काही पक्ष म्हणाले अंमलबजावणी करा, दुसरे पक्ष नाही बोलले तर हे सरकार टिकणार नाही. सरकारने ठरवलं अंमलबजावणी करायची आणि ज्यांना वाटतं अंमलबजावणी करु नये तर ते देखील सरकारसोबत आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे लोक काय ते निर्णय घेतील असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दरम्यान, सरकारमध्ये जे पक्ष बसलेत त्यांचे विचार अन् मतदार वेगळे आहेत. अगोदर एक निर्णय घेतला जातो, गृहमंत्रीवेगळी भूमिका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा वापर करुन हा तपास एनआयएकडे देण्याची भूमिका घेतली. राज्य सरकारमध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होतोय असं दिसायला लागलं त्यामुळे संशय निर्माण होतोय, त्यामुळे एकंदरित शासनात एकमत होतंय असं दिसत नाही,काँग्रेस-राष्ट्रवादी एनआयएकडे तपास वर्ग केल्यानंतर भूमिका काय घेते हे पाहावं लागेल, शाब्दिक नाराजी व्यक्त करणार की कृतीतून हे दिसेल हे आगामी काळात स्पष्ट होईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे.

************************************

💥लवकरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर होण्याची शक्यता..?


औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची मागणी होती. संभाजीनगर नावाची मागणी मनसे करतेय त्यांनी हा मुद्दा टिकवला पाहिजे. कारण त्यांची धरसोडवृत्ती सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील. मनसे आता बोलायला लागली आहे. आम्ही आधीपासून संभाजीनगर बोलतो. आता अधिकृतपणे मुख्यमंत्री निर्णय घेतील असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. याबाबत एबीपी माझाशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी १९८८ मध्ये मागणी केली होती. अनेकदा आम्ही विरोधात असताना याबाबत पत्रव्यवहार केला होता. यूपीत योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज नाव केलं होतं त्यावेळी लोकसभेतही मी हा प्रश्न विचारला होता. पण त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही. आता ठाकरे सरकार आहे त्यामुळे लवकरात लवकर संभाजीनगर नाव होऊ शकतं. गेल्या २ महिन्यापासून औरंगाबादचं नाव बदलण्याची तयारी सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

***********************************

 💥मंदिराबाहेरील भिकाऱ्याने दिली साईचरणी लाखोची देणगी..!

एकीकडे महाराष्ट्रात साईबाबा यांचा जन्म कुठे झाला यावरुन वादंग निर्माण झालेला असताना हा वाद कोर्टापर्यंत गेला आहे. तर साईबाबांनी दिलेली शिकवण आजही साईभक्त मोठ्या श्रद्धेने पाळत आहेत. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे साई मंदिराबाहेर बसणाऱ्या ७३ वर्षीय भिकाऱ्याने साई मंदिराला तब्बल ८ लाखांची देणगी दिल्याने परिसरात चर्चा होऊ लागली आहे.७३ वर्षीय याडी रेड्डी असं या भिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या ७ वर्षापासून याडी रेड्डी मंदिराबाहेर भीक मागण्याचं काम करत आहे. जवळपास ४ दशक याडी रेड्डी यानी सायकल रिक्षा खेचण्याचं काम केलं. एका अपघातात त्यांना आपले पाय गमवावे लागले त्यानंतर त्यांनी मंदिराबाहेर भीक मागण्यास सुरुवात केली.
याबाबत बोलताना याडी रेड्डी म्हणाले की, गेली ४० वर्ष मी रिक्षा खेचण्याचं काम करत होतो. सुरुवातीला मी १ लाख रुपये देणगी साई मंदिरासाठी दिली. त्यानंतर माझी तब्येत खालावत असल्याने माझ्याकडे असणाऱ्या पैशाची मला गरज भासली नाही म्हणून मी मंदिरासाठी आणखी देणगी देण्याचा निर्णय घेतला.तसेच ज्यावेळी मी मंदिरासाठी दान द्यायला लागलो त्यानंतर माझ्या कमाईतून वाढ होत असल्याचा अनुभव मला आला. मंदिरासाठी मी इतकं दान दिलेलं पाहून लोकं मला ओळखू लागली. त्यामुळे मला आश्चर्य झालं की माझ्या कमाईत वाढ होतेय. आजतागायत मी मंदिराला ८ लाख रुपये देणगी दिली आहे.यापुढेही माझी कमाई मी मंदिरासाठी देईन असं याडी रेड्डी यांनी सांगितले. याडी रेड्डी यांनी दिलेली देणगी पाहून मंदिर विश्वस्तांनीही त्यांचे कौतुक केले. याडी रेड्डींनी दिलेली देणगी मंदिराच्या उपयोगासाठी येणार असून त्यांच्या पैशातून गोशाळा बांधण्याचा आमचा मानस आहे. आम्ही कधीही भाविकांना देणगी देण्याची मागणी करत नाही. पण लोक स्वखुशीने देणगी देतात असं मंदिर विश्वस्तांनी सांगितले.  याडी रेड्डी यांच्या आयुष्यात इतका खडतर संघर्ष झाला तरीही त्यांनी पैशाचा मोह न बाळगता तो संपूर्ण पैसा मंदिराला दान केल्याने परिसरातील लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी वाढत आहे.

************************************

💥२ मुलांच्या आईने कुमारी असल्याची थाप मारून पैसे घेऊन केले लग्न..!


औरंगाबाद  -  दोन मुलांची आई असताना कुमारी असल्याची थाप मारून एजंट महिलेच्या माध्यमातून लाखो रुपये आणि दागिने घेऊन तरुणासोबत विवाह करणाऱ्या महिलेला क्रांतीचौक पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. या रॅकेटमधील एजंट महिला आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत. कविता रमेश देठे ऊर्फ सीमा अनिल रेसवाल असे अटकेतील महिलेचे नाव आहे. निरीक्षक उत्तम मुळक म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील श्रीराम वीरभान पाटील हे लग्नासाठी वधूचा शोध घेत होते. एक एजंट महिला सीमा रवी राठोड ऊर्फ सविता किसन माळी आणि अमोल रमेश देठे त्यांना जाऊन भेटली.  तिने तिच्या ओळखीची गरीब तरुणी उपवर असल्याचे सांगितले. काही दिवसांनी एजंट महिलेने कविताची ओळख सुनीता म्हणून श्रीरामसोबत करून दिली. तिने लग्नाची तयारी दर्शविली. मात्र, लग्नासाठी पैसे नसल्याचे सांगितले. श्रीरामने खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.  ३० जानेवारी २०१९ रोजी त्यांचा जळगावात विवाह झाला. तत्पूर्वीच श्रीरामकडून कविता, तिची साथीदार व अमोल देठे यांनी १ लाख रुपये घेतले होते. श्रीरामने तिच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे घातले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईची प्रकृती ठीक नाही, तिला भेटायला म्हणून कविता श्रीरामला घेऊन औरंगाबादला आली. लघुशंकेला जाऊन येते, असे सांगून कविताने तेथून धूम ठोकली. कविता न परतल्याने श्रीरामने क्रांतीचौक ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पोलीस तपास करीत असताना श्रीरामची पत्नी हरवली नाही ,ती स्वत:हून पळून गेल्याचे समजले. शिवाय ती दोन मुलांची आई आहे. तिने खोटे नाव सांगून  पैशासाठी लग्न  केल्याचे समोर आले. श्रीराम यांनी १२ फेब्रुवारी रोजी फिर्याद नोंदविली.

***********************************

💥किम जोंगला कोरोना व्हायरसच्या भितीने ग्रासले, चीनवरून परतलेल्या अधिकाऱ्याला घातली गोळी..!


उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांची विचित्र वर्तणूक साऱ्यांनाच माहीत आहे. एक छोटीशी चूक आणि जीव गमवावा लागण्याची शक्याता इथे असते. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी, उपचार करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. त्याचवेळी उत्तर कोरियामध्ये व्हायरसने संक्रमित पीडितांवर अत्याचार सुरू आहे.रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसच्या केवळ संशयावरून उत्तर कोरियाचे एका अधिकाऱ्याला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र या अधिकाऱ्याने चुकीने सार्वजनिक बाथरूम वापरले,त्यामुळे त्याचा जीव घेण्यात आला. दक्षिण कोरियातील वृत्तपत्र डोन्ग-ए-इलबो च्या माहितीनुसार, चीन मधून परतल्यावर त्या अधिकाऱ्यांला स्वतंत्र ठेवलेले होते. मात्र सार्वजनिक बाथरूम वापरल्यामुळे कोरोना व्हायरस पसरवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आणि गोळी घाऊन हत्या करपण्यात आली. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांच्या अनुमतीशिवाय क्वॅरेंटाइन (संक्रमित लोकांसाठी उभारण्यात आलेली स्वतंत्र जागा) सोडून जाणाऱ्या विरोधात थेट सैनिकी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यूके मिररच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या एका अन्य अधिकाऱ्याला चीनमधून आल्याची माहिती लपवल्याबद्दल देशातून हकलण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या वृत्तानुसार उत्तर कोरियात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी आहे. मात्र त्याची माहिती लपवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या