💥धावत्या तपोवन एक्सप्रेस मुंबई मधून पडून युवक गंभीर जखमी...!💥औरंगाबाद दौलताबाद दरम्यान शक्तीधाम मंदीर समोरील भागात रेल्वे किमी 105 येथे घडली घटना💥

15 फेब्रुवारी 20
  औरंगाबाद दौलताबाद दरम्यान शक्तीधाम मंदीर समोरील भागात रेल्वे किमी 105 येथे जालना हुन नासिक कडे जाते वेळी ताशी 100 च्या वेगाने धावत्या नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस मधून पडून दुपारी 15:22 वाजेच्या सुमारास युवक गंभीर जखमी झाला आहे
घटनेची माहिती RPF इन्स्पेक्टर अरविंद शर्मा यांना जवळ शेतात काम करत असताना शैलेश सुखदेव ढोले वय 25-30 हा प्रवासी पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती शेतकरी युवक रामेश्वर विष्णू आधाने यांनी कळवली
RPF PI शर्मा हे सुट्टीवर असून त्यांनी ही माहिती रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना कळवली
रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी हे 12 मिनिटांत  घटनास्थळी दाखल झाले सोबतच पोलीस नियंत्रण कक्ष औरंगाबाद यांना माहिती दिली यावरून दौलताबाद पोलीस हे पोलीस व्हॅन सह 15 मिनिटास पोहचले
108 अंबुलन्स येताच जखमी युवकास रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी तरुण शेतकरी रामेश्वर आधाने व भगवान आधाने यांनी उपचार कामी घाटी हॉस्पिटलमध्ये 16:10-15 वाजता दाखल केले असून डोक्यास गंभीर जखम आहे
वडील व भाऊ यांचा मोबाइल नंबर जखमी कडून घटनास्थळी घेऊन माहिती दिली आहे वडील व इतर नातेवाईक  जालना हुन निघाले असून लवकरच घाटी हॉस्पिटलमध्ये पोहचत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या