💥रेल्वे सेनेच्या आंदोलनास मोठे यश 57562/57561 दोन्ही पैसेंजर सुरूच राहणार...!


💥रेल्वे प्रवासी सेनेकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला💥
  
आज सकाळी औरंगाबाद रेल्वे स्टेशनला केलेल्या जबरदस्त आंदोलनास मोठे यश मिळाले असून 57561 काचीगुडा नगरसोल पैसेंजर औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान रद्द
57562 नगरसोल ते काचीगुडा पैसेंजर मेगाब्लॉक च्या नावाने रद्दचा निर्णय रेल्वे प्रशासन ने मागे घेतला

आज संध्याकाळी 7 वा पैसेंजर औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान जाणार आहे
उद्या सकाळी 57562 नगरसोल काचीगुडा पैसेंजर परभणी पर्यत धावणार आहे

यामुळे जाहीर करण्यात आलेला रेल्वे रोको आंदोलन रद्द करण्यात आला आहे

कोणीही रेल्वे रोको आंदोलन करणार नाही व करू नये
रद्द चा निर्णय हा रेल्वे सेनेचा मोठा विजय असून आज संध्याकाळी 6:20 ते 6:45 आनंदउत्तसोव साजरा करण्यात आला यावेळी रेल्वे प्रवासी सेनेचे पदाधिकारी व सदस्य प्रचंड संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांचे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी आभार व्यक्त केले...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या