💥बँक खातेदारांनो सावधान,येत्या मार्च महिन्यात तब्बल 19 दिवस राहणार बँका बंद....!💥मार्चमध्ये पगारवाढीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी दिली संपाची हाक दिली💥

बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण मार्च महिन्यात तब्बल 19 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार, रविवारसह होळीचा  सण असल्याने सुट्टी म्हणून बँका 16 दिवस बंद असणार आहेत. तर 3 दिवस बँकेने संप पुकारला आहे. असे एकूण 19 दिवस बँकेचे कामकाज हे बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

मार्च महिन्यात केवळ 12 दिवस बँकेचे कामकाज चालणार असल्याने तुम्हाला बँकांची कामं लवकरच आटपावी लागणार आहे. या महिन्यात बँकेने संप देखील पुकारला आहे. जानेवारी, फेब्रुवारीनंतर आता मार्चमध्ये पगारवाढीसाठी त्यांनी संपाची हाक दिली आहे. 11 ते 13 मार्च दरम्यान संप असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांनी 25 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. मार्च महिन्यातील सुट्टींच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्याच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या