💥रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक स.उपिंदर सिघ यांनी केले आहे💥
मुदखेड ते परभणी दरम्यान 81.43 किलोमीटर दुहेरीकरण लिंबगाव -चुडावा-पूर्णा-मिरखेल दरम्यान 31.93 किलोमीटर चे काम पूर्ण करण्याकरिता आणि सिग्नलिंग च्या कार्या करिता तसेच रेल्वे पटरी आपसात जोडण्याकरिता 09 दिवसांचा लाईन ब्लॉक हाती घेण्यात आला आहे.
हे कार्य वेळेत पूर्ण करण्याकरिता रेल्वे विभागातील शेकडो कर्मचारी कार्य करत आहेत. या ब्लॉक मुळे दिनांक 15 ते 18 फेब्रुवारी -2020 रोजी परिणाम होणाऱ्या रेल्वे गाड्या ची यादी सोबत जोडली आहे.
या ब्लॉक मुळे जनतेला होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याकरिता हा लाईन ब्लॉक घेणे अनिवार्य होते, तरी जनतेने रेल्वे प्रशासनास या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन श्री उपिंदर सिघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी केले आहे...
0 टिप्पण्या