💥परभणी-मुदखेड दुहेरीकरण नऊ दिवसांचा लाईन ब्लॉक,दुहेरीकरणाच्या कामास जलदगती...!



💥दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी ला परिणाम होणाऱ्या गाड्या💥

मुदखेड ते परभणी दरम्यान 81.43 किलोमीटर दुहेरीकरणातील लीम्बगाव-चुडावा-पूर्णा-मिरखेल दरम्यान  31.93 किलोमीटर चे काम पूर्ण करण्याकरिता आणि सिग्नलिंग च्या कार्या करिता तसेच रेल्वे पटरी आपसात जोडण्याकरिता 09 दिवसांचा लाईन ब्लॉक हाती घेण्यात आला आहे.
हे कार्य वेळेत पूर्ण करण्याकरिता रेल्वे विभाग्तील शेकडो कर्मचारी कार्य करत आहेत.  या ब्लॉक मुळे  दिनांक 08 आणि 09 फेब्रुवारी -2020 रोजी परिणाम होणाऱ्या  रेल्वे गाड्या ची यादी सोबत जोडली आहे.
 या ब्लॉक मुळे जनतेला होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. दुहेरीकरणाचे  काम पूर्ण करण्याकरिता हा लाईन ब्लॉक घेणे अनिवार्य होते, तरी जनतेने रेल्वे प्रशासनास या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन श्री उपिंदर सिघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी केले आहे.

या ब्लॉक मुळे दिनांक 06 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान रद्द झालेल्या/ अंशतः रद्द झालेल्या/मार्ग बदलेल्या  गाड्यांची माहिती नांदेड रेल्वे विभागाचे अधिकृत ट्विटर हेंडल -@drmned आणि फेसबुक - Nanded Rly Divn या सोशल साईट वर सुद्धा उपलब्ध असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या