💥पुर्णेत शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंती दिनी रक्तदान शिबीर संपन्न..!


💥'रक्तदान श्रेष्ठदान' शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करुन हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुखांना दिली विनंम्र श्रध्दांजली💥

पुर्णा/शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज गुरुवार दि.२३ जानेवारी रोजी हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जन्मदिनी शिवसेना शहर शाखा व  युवासेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम व युवासेना शहर प्रमुख विकास वैजवाडे,शहर संघटक विद्यानंद तेजबंद यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'रक्तदान श्रेष्ठदान' असल्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.गंगाबाई एकलारे,तर प्रमुख अतिथी म्हणून पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.गोवर्धन भुमे,शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिभाऊ गाडेकर,डॉ.विनय वाघमारे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन भायेकर,डॉ.पाटील,शिवसेना नेते संतोष एकलारे, शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी,मा.नगराध्यक्ष साहेब कदम,नगरसेवक श्याम कदम,न.पा.पाणी पुरवठा सभापती ॲड.राजेश भालेराव, नगर परिषद आरोग्य व स्वच्छता सभापती ॲड.हर्षवर्धन गायकवाड,बालाजी वैद्य,रवि रतनलाल जैस्वाल, सुरेंद्र चिटणीस, शंकर गलांडे,आदींची उपस्थिती होती.
 प्रारंभी छत्रपती शिवराय व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजक शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम यांनी केले तर आभार युवासेनेचे विकास वैजवाडे यांनी मानले. कार्यक्रमास सुनिल कदम,श्रीनिवास तेजबंद, सोमनाथ शिराळे,रवि भायेकर, संदिप वैजवाडे,राम कदम, अंकित कदम, बालाजी पिसाळ, आदीं शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.यावेळी या रक्तदान शिबिरात एकूण १०० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.नांदेड येथिल जिवन आधार रक्तपेढीचे साईनाथ चौधरी यांनी काम पाहिले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या