💥परभणीतील व्यंकटी शिंदे टोळी विरोधात पोलीस अधिक्षक उपाध्याय यांनी वापरले 'मोका' अस्त्र....!



💥व्यंकटी शिंदे सह 12 साथीदारांच्या टोळी विरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई💥


परभणी/जिल्ह्यातील गुन्हेगारी विरोधात सातत्याने धाडसी कारवाई करीत प्रसंगी 'एमपीडी ॲक्ट' व 'मोका' सारख्या कायद्याचा वापर करीत अत्यंत काटेकोरपणे गुन्हेगारीला लगाम लावण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे कर्तव्यकठोर अधिकारी कृष्णकांत उपाध्याय यांनी पुन्हा एकदा 'मोका' कायद्याचे अस्त्र वापरत शहरातील व्यंकटी शिंदे आणी त्याच्या 12 साथीदारांसह टोळी विरुद्ध 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे.
परभणी शहरात मध्यंतरी एक गावठी कट्टा जिवंत काडतुसे एक रिवालवर हे टोळी सदस्यांकडून सापडल्याची भयंकर घटना घडली होती परभणी महानगर पालिकेतील शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आणि स्वतःचे टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी खून करण्याचा कट रचला होता असा गंभीर आणि प्रमुख आरोप त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लावला आहे यानुषंगाने  शिंदे आणि बारा जणांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून आतापर्यंत 50 जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या