💥सन २०२० मध्ये पुन्हा क्रांतिकारी पत्रकारीतेला सुरुवात करणार - चौधरी दिनेश
--------------------------------------
भारतीय कालगणने नुसार उद्या येणारे ०१ जानेवारी २०२० हे इंग्रजी नवीन वर्ष आपले नसले तरीही प्रत्येक शासकीय निमशासकीय खाजगी कार्याची सुरुवात इंग्रजी कालगणने नुसारच होत असते मित्रांनों इंग्रजी कालगणने नुसार मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आता जरी देत असलो तरीही मराठी नवर्षाच्या शुभेच्छा मी आपणास गुडी पाडव्यालाही देणार आहेच वृत्तपत्र क्षेत्रात वृत्तांकनाला मी सन १९९१ पासून सुरुवात केली सन १९९१ ते सन २०२० या २९ वर्षाच्या कालावधीत सन १९९१ साली मी नांदेड येथून प्रकाशित होणाऱ्या व श्री.प्रभाकरराव रावके संपादित दै.सत्यप्रभा या वृत्तपत्रातून वृत्तांकनास सुरुवात केली यानंतर सन १९९२ यावर्षी स्वतःच्या मालकीचे साप्ताहीक स्त्री करुण पुकार हे मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले यानंतर सन १९९९ साली औरंगाबाद येथून हिंदी पाक्षिक प्रजातंत्र शक्ती हे वृत्तपत्र प्रकाशित केले या वृत्तपत्राचा प्रथम अंक ३२ पेजचा प्रकाशित करुन वृत्तपत्र क्षेत्रात खळबळ माजवण्याचे काम केले यानंतर सन २००८ या वर्षी स्वतःच्या मालकीचे 'अजीतपत्र'या मासिकाला सुरुवात केली या नंतर औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या व सन्माननीय प्रविण भैया बुरांडे संपादित मराठी दैनिक वृत्त टाईम्स व दैनिक जनपत्र या वृत्तपत्रांत बराच काळ जनहीतवादी वृत्तांकन करुन जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यानंतर औरंगाबाद येथूनच प्रकाशित व सन्माननीय कानिफ अन्नपुर्णे सर संपादित दै.प्रसार या वृत्तपत्रात बराच काळ अगदी निर्भिडपणे वृत्तांकन करुन जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यानंतर औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देवगिरी तरुण भारत सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक सोलापूर तरुण भारत जालना येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक आनंदनगरी या मराठी वृत्तपत्रांमध्ये अगदी जनहीतवादी व निर्भिड लिखान करुन असत्या विरोधात लिखान केले माझ्या प्रत्येक प्रकाशित वृत्तानंतर मला विविध संकटांना धमक्यांना तोंड द्यावे लागले परंतु न डगमगता सातत्याने मी वृत्तांकन करीत संघर्षाची मशाल तेवत ठेवली असतांना सन २०१३ यावर्षी मात्र गुटखा तस्करी व मटका जुगारा विरोधात मी केलेले वृत्तांकन काही लोकांच्या जिव्हारी लागल्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबावर त्यांनी ॲसिड हल्ला करीत माझ्या लेखणीची धार बोधट करण्याचा आणी वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला परंतु यानंतरही न डगमगता पुन्हा मी बिड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक प्रजापत्र या मराठी वृत्तपत्रातून वृत्तांकन करण्यास जोरदार सुरुवात केली परंतु काही काळाने या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी सन्माननीय बालाजी देवके सरांनी दैनिक प्रजापत्र सोडल्यानंतर मी स्वतःच्या 'अजीतन्युज हेडलाईन्स ' या वेबवृत्तवाहीणीची सुरुवात करुन पुन्हा या क्षेत्रात कार्यरत राहून जनसामान्यांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणी करीत राहील यात तिळमात्र शंका नाही आज ३१ डिसेंबर २०१९ हा वर्षाचा शेवटचा दिवस या वर्षाच्या सरते शेवटी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत तुमच्याशी हितगुंज साधावा या दृष्टीने ही अगदी सविस्तर भली मोठी पोष्ट प्रकाशित करीत आहे. मित्रांनों वृत्तपत्र क्षेत्रात काम करीत असतांना जनहीतवादी व निर्भिडपणे सत्य वृत्त प्रकाशित करणे किती जिवघेणे आणि धोकादायक असते याचा मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे.लेखणीची धार तेज करत आलेल्या प्रत्येक संकटावर मात करीत आपला जनसामान्यांना न्याय देण्याचा दृढ संकल्प कद्दापी सोडायचा नाही आणी या क्षेत्रातून माघार घ्यायची नाही अशी माझी जिद्द कायम ठेवली असून येणाऱ्या नवीन वर्षात अर्थात सन २०२० मध्ये पुन्हा क्रांतिकारी पत्रकारीतेला सुरुवात करणार असल्याने माझ्या तमाम चाहत्यांना मित्रांना आणी वृत्तपत्र क्षेत्रातील सन्माननीय मान्यवरांना नवीन वर्षाच्या मनपुर्वक शतशः शुभेच्छा देऊन अशेच प्रेम आपणा कडून मला सातत्याने मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो....धन्यवाद...
आपला - चौधरी दिनेश (रणजीत सी.)
0 टिप्पण्या