💥पुर्णा शहर बचाव समितीने दिले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्तांना निवेदन💥
पुर्णा/शहर म्हणजे अतिसंवेदनशिल शहर या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शहरातील दंगलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील टिळकरोड,स्वामी दयानंद सरस्वती चौकातील अगदी पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परवाना धारक देशी-विदेशी वाईन शॉप तसेच देशी दारु अड्डा चालकांच्या मनमानी कारभाराला परिसरातील रहिवास्यांना प्रचंड सहन करावा लागत असून पहाटे ०५-०० वाजेपासूनच परिसरात अक्षरशः तळीरामांची जत्रा भरत आहे.संबंधित परवाना धारक रवि जैस्वाल वाईन शॉप चालक व याच परिसरातील वसंतलाल देशी दारु अड्डा चालक रात्री दारुची दुकाने बंद केल्यानंतर परिसरात बेकायदेशीर देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना दारु साठा पुरवून रात्रंदिवस मद्य शौकीन तळीरामांची यथेच्छ व्यवस्था करित असल्यामुळे परिसरातील रहिवासी तसेच
या मार्गासेवरून येणाऱ्या जाणाऱ्या महिला शाळकरी विद्यार्थींनीना तळीरामांच्या अश्लील भाषेचा छेडछाडीला सामोरे जावे लागत असल्याने जनसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन पुर्णा शहर बचाव समितीच्या वतीने दि.२६/११/२०१९ रोजी औरंगाबाद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्तांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन दंगलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या लोकमान्य टिळक रोड,स्वामी दयानंद सरस्वती चौक,जुना मोंढा,महाविर नगर,बसस्थानक रोड परिसरातील परवाना धारक रवि रतनलाल जैस्वाल वाईन शॉप,वसंत जैस्वाल देशी दारु अड्डा,पुजा बिअरबार परमीट रुम,जुना मोंढा परिसरातील सुर्या बिअर शॉपी,विश्वरुपा बिअरबार परमीट रुम,अंबीका बिअर बार परमीट रुम तात्काळ शहरा बाहेर स्थलांतरीत करण्याची मागणी केली असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी परभणी,जिल्हा पोलीस अधिक्षक परभणी,जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक परभणी यांच्यासह पोलीस स्थानक पुर्णाऔ यांना देण्यात आल्या असून या निवेदनावर पुर्णा शहर बचाव समितीचे पत्रकार दिनेश चौधरी,युवा नेते राज नारायनकर,सामाजिक कार्यकर्ते दिनेश सोनकांबळे,रामा पारवे आदींसह परिसरातील तब्बल दोनशें ते सव्वा दोनशे नागरिक व्यापारी तसेच प्रतिष्ठितांसह महिलांच्या स्वाक्षरी आहेत..
0 टिप्पण्या