💥बालदिनानिमित्त कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच ही दुर्देवी घटना घडली💥
कल्याण - तळघरात असलेल्या विजेचा धक्का लागल्याने एका शाळेतील राकेश ढोणे (४०) या शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना शाळेत बालदिनानिमित्त कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच ही दुर्देवी घटना घडली. पूर्वेतील नांदिवली परिसरातील तलावाजवळ द्वारका सेमी इंग्लिश हायस्कूल आहे. बालदिनानिमित्त गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास शाळेच्या गच्चीवर तयारी सुरू होती. शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. त्यावेळी, अचानक आवाज आल्याने सर्वांनी तळघराकडे धाव घेतली. तेव्हा, राकेश तळघरात असलेल्या पाण्यामध्ये पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी, उपस्थित असलेल्या शिक्षकांनी राकेशला जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तळघरात असलेल्या पाण्यामध्ये विद्युत पुरवठयाचा धक्का लागल्याने राकेशचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे...
0 टिप्पण्या