💥अंगणवाडीतील बालकांना पुरवल्या जाणाऱ्या पोषक आहारात निघाल्या आळ्या दगड💥
पुर्णा/शहरासह ग्रामीण भागातही चालणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये शासना तर्फे बालकांना पुरवल्या जाणाऱ्या पोषक आहारात आळ्या व दगड निघत असल्यामुळे निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गंभीर प्रकार उजेडात आल्यानंतर हीं जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शंकेची पाल चुकचूकतांना दिसत आहे.असाच प्रकार नुकताच उघडकीस आला असून महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी प्रकल्प परभणी पूर्णा अंगणवाडी क्रमांक 95 मध्ये काल बालकांच्या पूरक आहारामध्ये चक्क आळ्यावर व दगड निघाले सदर प्रकरणाची सहा निशा म्हणून स्थानिक नागरिकांनी अंगणवाडीतील शिक्षिका व मदतनीस यांच्याशी विचारपूस केली असता त्यांनी चक्क उडवाउडवीची उत्तर दिल्याने पालकवर्ग संतप्त झाला यावेळी या गंभीर प्रकारा संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील समाधानकारक उत्तर दिले नाही उलट संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तुमच्या घरच्या आहारात आळ्या दगड येतील की नाही असा प्रतिप्रश्न करुन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले यावेळी संतप्त नागरिकांनी जोपर्यंत या प्रकरणाचा तपास योग्यरित्या होत नाही तोपर्यंत अंगणवाडी बंद ठेवावी असे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून घडलेल्या प्रकरणातील सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे...
0 टिप्पण्या