💥पिकनुकसानीचा सर्व्हे करन्यासाठी प्रशासन प्रत्यक्ष शेतात....!



💥गावोगावी भेटी देवुन पिकनुकसानीची केली पाहणी मदत मिळन्यासाठी शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत💥

फुलचंद भगत

मंगरूळपीर-परतीच्या पावसाने धुमाकुळ घालुन हाताशी आलेला शेतकर्‍यांचा घास हिरावून नेल्याने आणी या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने स्पाॅट पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत असल्याने प्रशासकीय यंञणा कामाला लागली असुन शेतकर्‍यांच्या शेतात जावुन पिकनुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकर्‍यांना दिलासा दिल्याने शेतकर्‍यांच्या जीवात जीव आला आहे.
           वाशिम जिल्ह्यातील  शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.सोयाबिनसह अन्य पिकांचेही  मोठे नुकसान जिल्ह्यात झाले आहे.हाता तोडांशी आलेला घास हिरावून न्यावा तशीच काहीशी अवस्था या शेतकºयांची झाली आहे. ज्या भागात जमीनीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणच्या पिकाने केव्हाचीच मान टाकली.मंगरुळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबिनला कोंब आले. यामुळे तयार झालेले पिक घरा पर्यंत पोहचणे मुश्किल झाले आहे.नुकसानीच्या दु:खाचा डोंगर डोक्यावर घेऊन वावरणारा शेतकरी फक्त त्याला झालेल्या नुकसानीची मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे.शेतकर्‍यांनी सबंधित प्रशासनाला नुकसान  झाले आहे याविषयी आपले गार्‍हाने मांडले. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंञ्यांनी नुकसानीचे स्पाॅट पंचनामे करन्याचे आदेश दिले. त्यानंतरच प्रशासन हलले.
मात्र शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले पाहिजेत अशा मागणीने जोर धरला. यावर्षी शेतात साचलेले पाणी पाहून हतबल झाला असुन. शेतकºयांच्या डोळ्यातील पाण्याने निसर्गही वेदनेने व्याकूळ झाला असेल. ओल्या दुष्काळात राजकीय पुढाºयांची कोरडी सहानूभूती नको. शासकीय भरीव आर्थिक मदत हवी अशी मागणी होत असतांना प्रशासनाने शेतकर्‍यांची ही आर्त हाक ऐकली आणी जिल्ह्यातील पिकनुकसाची पाहणी करन्याचे आदेश धडकले.दि.१नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड आणी पारवा येथे स्वतः ऊपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जि.प.ऊपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हा कृषी अधिकारी तोटावार,बाजार समितीची संचालक विठ्ठलराव गावंडे,शिवणी रोड येथील सरपंच लल्लुभाऊ गारवे आदींनी शेतकर्‍यांच्या शेतात जावुन पिक नुकसानीची पाहणी केली एवढेच नाही शेतकर्‍यांच्या घरी जावुन खराब झालेले सोयाबिनचीही पाहणी करुन नुकसान भरपाई जरूर मिळेल असा दिलासा दिल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.प्रशासनाने शेतकर्‍यांच्या संवेदना जावुन प्रत्यक्ष भेट घेतल्याने शासनाविषयी विश्वास निर्माण झाला आहे.यावेळी मंडळ अधिकारी चौधरी, पारवा येथील सरपंच गोपाल लुंगे,महंम्मद गारवे,हरिदास पाटील,संजय चव्हाण,दिपक गावंडे,संतोष गावंडे,विठ्ठल चव्हाण,मनोहर चव्हाण,इमाम गारवे,दिपक सावजी,नंदु चव्हाण यांचेसह शेतकर्‍यांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या