💥बंजारा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेला खंबीर साथ देण्याचा निर्धार आ.हरिभाऊ राठोड यांची घोषणा💥
सोनपेठ/प्रतिनिधी
महाराष्ट्रात मागील पाच वर्षापासून शिवसेना-भाजपा सरकारने चांगले निर्णय घेतले असून भटक्या विमुक्त,बंजारा,धनगर,बारा बलूतेदार समाजासह ओबीसी,मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लागून सरकारच्या माध्यमातून रखडलेल्या प्रश्नावर न्याय मिळण्यासाठी सकल ओबीसी,बंजारा,धनगर,बारा बलूतेदार भटक्या विमुक्त,मुस्लिम ओबीसी समाजाने निर्णय घेऊन शिवसेनेसोबत येणे गरजेचे होते.मात्र त्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने विधानपरिषद सदस्य आ.हरिभाऊ राठोड यांनी पुढाकार घेत माजी आ.प्रकाश शेंडगे,बालाजी शिंदे,युनूस मनियार यांच्याशी चर्चा करुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सकल ओबीसी,भटक्या विमुक्त,बंजारा,धनगर,बारा बलूतेदार,मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचा प्रस्ताव ठेवला होता या मागण्यावर योग्य निर्णय घेऊन उपेक्षित असणाऱ्या वरील प्रवाहाना न्याय मिळवून देण्याच्या ठोक आश्वासनावर शिवसेनेसोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून मित्रपक्ष म्हणून बंजारा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेला खंबीर साथ देण्याचा निर्धार आ.हरिभाऊ राठोड यांच्यासह माजी आ.प्रकाश शेंडगे,युनूस मनियार,बालाजी शिंदे यांनी केला आहे.बंजारा सेनेच्या माध्यमातून या राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे या इर्शेने सध्या हे चारही प्रमुख नेते प्रचार करत आहेत.बंजारा सेना संघटनेच्या माध्यमातून आ.हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजासोबतच ओबीसी समाजाच्या घराघरात कार्यकर्ता निर्माण केलेला आहे.या संघटनेने सामाजिक,आध्यात्मिक,धार्मीक कार्यक्रमात सहभागी होऊन अखंड राष्ट्रनिर्मितीमध्ये आपले योगदान दिलेले आहे.सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून यासाठी आ.हरिभाऊ राठोड,माजी आ.प्रकाश शेंडगे,बालाजी शिंदे,युनूस मनियार ही टीम राज्याच्या प्रचारयंत्रणेत सहभागी झालेली दिसून येत आहे.नुकतेच परभणी जिल्ह्यात आ.हरिभाऊ राठोड यांच्या दोन ठिकाणी सभा पार पडल्या या सभेत त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्व समाजाला न्याय देण्याचा अजेंडा असून ओबीसी,भटक्या विमुक्त,धनगर,बंजारा मुस्लिम ओबीसी समाजासह बारा बलूतेदार समाजाचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागतील यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला पाहीजे यासाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील परभणीचे उमेदवार आ.डॉ.राहुल पाटील व गंगाखेडचे उमेदवार विशाल कदम यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांची पालम व परभणी येथे सभा पार पडली...
0 टिप्पण्या