💥प्रभारी तालुकाध्यक्ष मुषर्रफ खान यांनी आज महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार बोबडे यांना दिला पाठींबा💥
राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे गंगाखेड तालुका अध्यक्ष तथा फादर बॉडीचे प्रभारी तालुकाध्यक्ष मुषर्रफ खान यांनी रविवारी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, धनगर साम्राज्य सेना, युवा स्वाभिमान पक्षा, धनगर समाज सेवा संस्थाचे उमेदवार असलेले सखाराम बोबडे पडेगावकर यांना मतदारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात भर म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे गंगाखेड तालुकाध्यक्ष मुशर्रफ खान यांनी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर भाऊ चव्हाण, श्रीरंग शिंदे पडेगावकर, उमेदवार सखाराम बोबडे उपस्थित होते. एकूणच मुशर्रफ खान यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे...
0 टिप्पण्या