💥तरुणांनो,दारु मटणावर मतदान विकत घेणार्या ऊमेदवाराला धडा शिकवा💥
फुलचंद भगत
वाशिम-यंदाची विधानसभा निवडणूक दारुमुक्त होवून कुठलेही मनात भय न बाळगता भयमूक्त परिस्थीतीत मतदान प्रक्रीया पार पडावी यासाठी महिलांनी तसेच युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे असुन दारु व मटणावर मतदार विकत घेणारांवर पायबंद बसावा यासाठी आपली अस्मिता गहाण न ठेवता सुजान आणी सुज्ञ मतदारांनी आपल्या पसंतीच्या योग्य ऊमेदवारास तसेच आपल्या मतदार संघाचा विकास करणार्या ऊमेदवारात पसंती देणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी बोलुन दाखवले.
निवडणूक म्हटली की आंबटशौकीनांची चांदीच,कारण या कालावधित दारु आणी मटणाच्या पार्ट्याला बहुदा ऊत आलेला असतो.पैसे ओतुन काही ऊमेदवार मतदार आपल्याकडेच आकर्षीला जावा व आपल्याच चिन्हापुढचे बटण दाबावे यासाठी मतदाराच्या पायाशी लोळण घ्यायलाही मागेपुढे पाहत नसतात तर दुसरीकडे शौकीनांना पाहीजे तशी व्यवस्थाही या कालावधीत होतांना पाहावयास मिळते.याच निवडणूक कालावधीत शाळकरी मुले,तरुण दारुच्या व्यसनाला लागत असल्याचे भयान वास्तवही पाहावयास मिळते.चार दिवस मटण, दारु पाजुन पाच वर्ष झुलत ठेवणार्या ऊमेदवारांचा डाव वेळीच लक्षात घेतला तर तरुण पिढी वाममार्गाला न लागता व सजग राहुन मतदान केल्याने विकास करणारा ऊमेदवार निवडुन आनता येवु शकते.याकरीता विशेषकरुन महिलांनी व तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे."जो पाजेल नवर्याला दारु,त्याचा पक्ष मातीत गाडु" अशी महिलांनी भुमिका घेणे आवश्यक आहे.तरुणांनीही आमिषाला बळी न पडता योग्य ऊमेदवाराला निवडुन द्यावे जेणेकरुन तो मतदार संघामधे रोजगार तथा विविध प्रकारे विकास करेल.यंदाची निवडणूक दारुमुक्त करन्यासाठी प्रशासनासोबतच जनतेनेही सजग राहुणे गरजेचे आहे.दारु व मटणापायी मतदान न विकता स्वाभिमानाने मतदान करुन लोकशाही बळकट करणे गरजेचे आहे.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या