💥पुर्णा-पालम-गंगाखेड तालुक्यात लक्ष्मीपुजना पुर्वीच लक्ष्मीची बरसात जनशक्तीवर धनशक्तीने केली मात ?💥
परभणी/जिल्ह्यातील चार मतदासंघात सर्वात जास्त चर्चेत असलेला मतदार संघ म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदार संघ असून या मतदार संघात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या काही धनदांडग्या उमेदवारांच्या लक्ष्मीअस्त्रापूढे प्रशासनाच्या कायद्याचे शस्त्र ही बोधट ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून तिन तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही अक्षरशः दिपावलीच्या लक्ष्मीपुजना पुर्वीच लक्ष्मीची बरसात होत असल्याचे बोलले जात आहे.
आज सोमवार दि.२१ आक्टोंबर रोजी सकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास मतदानास सुरुवात होणार असून गंगाखेड विधानसभा म्हटले की पैश्याचा पाऊस अपेक्षेप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही आमदार होण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधलेल्या धनदांडग्या लक्ष्मीपुत्रांनी मागील एक वर्षापासून गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा-पालम-गंगाखेड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गावपातळीवर जाऊन कमी अधिक प्रमाणात सढळ हाताने सामाजिक स्तरांवर मदत करीत लाखों रुपये वाटत आपले बस्तान बसवले. दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनीही गावपातळीवरील मतदारांत पैसे वाटपाचा आलेख तयार करून ठेवला आहे. आचारसंहीता सुरू झाल्या पासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मागे घेण्यापर्यतची कालावधी संपल्यानंतरही काल शेवटच्या दिवशी रात्रभर काही धनदांडग्या उमेदवारांनी 'लक्ष्मीअस्त्राचा' तुफानी मारा केल्याचे निदर्शनास येत असतांना प्रशासकीय यंत्रणा मात्र डोळेझाक करीत असल्याचे सर्वसामांन्य मतदारांच्या चर्चेतून ऐकावयास मिळाले.दरम्यान मतदारसंघात चोरपावलाने लक्ष्मीअस्त्राने सुसज्ज उमेदवारांची यंत्रणा गावपातळीवर राबत असतांना प्रशासकीय यंत्रणा मात्र अगदी कासवगतीने चालत असल्याची विश्वसनीय माहिती एका उमेदवाराच्या पदाधी का-यांने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.२०१४ च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी अस्त्राचा मारा करण्यात आला होता.त्यावेळी पुर्णा पोलिस ठाण्यात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांसह अनेक कार्यकत्यावर गुन्हें दाखल करण्यात आले होते.यावर्षीही जिल्हा प्रशासनाकडून मतदारसंघात मतदारांना कोणतेही अमीष दाखवल्या जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असताना पुर्णा-पालम-गंगाखेड तालुक्यात प्रशासनाकडून नेमणुक करण्यात आलेल्या पथकाकडून म्हणावी तशी छाणबीन करीत नसल्याचे दिसते आहे.मतदारसंघात जागोजागी चेकपोस्ट लावलेले असताना गावागावांत लक्ष्मीअस्त्रासह संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरिता ४८ तास पुर्व मद्य विक्रीवर बंदी असतांनाही अवैधरित्या दारुविक्री होतीच कशी ? असा ही गंभीर प्रश्न उपस्थित होत असून धनदांडग्या उमेदवारांमुळे या तीन्ही तालुक्यातील मतदारांची दिवाळी मात्र जोरदार होणार यात तिळमात्र शंका नाही.
0 टिप्पण्या