💥भाजपने विश्वासघात केला,केसांचे गळा कापला, दिलेला शब्द पाळला नाही💥
लोकसभेच्या निवडणुकी अगोदर सगळ्या राजकीय पक्षांन बरोबर चर्चा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टिच्या नेत्यांच्या बैठकी मध्ये शिवा संघटनेचे तिनही मुद्दे भाजपने मान्य केले होते त्यावरून लोकसभेच्या निवडणुकी अगोदर शिवा संघटनेची भाजप सोबत युती झाली असुन शिवा संघटना भाजप सोबत महायुतीचा घटक पक्ष म्हणुन घोषित केले होते, त्यानुसार विधानसभेत शिवा संघटनेला पाच जागा देण्याचे ठरलेले असतांनाही भाजपकडून शिवा संघटनेला एकही जागा देण्यात आली नाही, भाजपने विश्वासघात केला, केसांचे गळा कापला, दिलेला शब्द पाळला नाही म्हणून हातपाय गाळून बसन्यापेक्षा आपण शिवा संघटनेच्या वतीने दोन मतदारसंघा मध्ये उमेदवारांचे अर्ज भरलेले होते त्यातील एक नांदेड जिल्ह्यातील देगलुर मतदार संघ एस सी राखिव जो लिंगडेरच्या प्रमाण पत्रावर *_बालाजी बळीराम बंडे_* आणि दुसरा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदार संघात शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस *_धन्यकुमार शिवणकर_* यांचा फाॅम भरलेला होता.
असाच अनुभव मित्र पक्ष असलेल्या *रासपलाही भाजपचा आला.* रासपने ३४ जागा मागितलेल्या असतांना केवळ रासपला दोन जागा देण्यात आल्या, तसे दिल्याचे दाखवले परंतु त्या दोन्ही जागेवर रासपचे म्हणुन भाजपचेच उमेदवार देण्यात आले व त्यांना निशानी म्हणुन कमळ चिन्हच देण्यात आले आणि म्हणुन भाजपच्या युतीच्या शिवाय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत AB फाॅम जोडून *रत्नाकर गुट्टे* या उमेदवाराचा अर्ज अगदी शेवटच्या दिवशी ४ आॅक्टोबर ला भरण्यात आला होता. मित्र पक्ष असलेल्या रासप आणि शिवा संघटना यांचे फक्त महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अर्ज भरलेले होते देगलुर आणि गंगाखेड म्हणुन *मा.महादेव जानकर* व राष्ट्रीय समाज पक्षाशी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष *मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर* यांची बोलणी होऊन शिवा संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाची *युती करण्याचा निर्णय झाला* यामध्ये गंगाखेडची जागा राष्ट्रिय समाज पक्षाला आणि देगलुरची जागा शिवा संघटनेला अशा प्रकारे दोनही जागा शिवा संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाचे युतीचे उमेदवार म्हणून ताकदिने लढवण्याचा निर्णय झालेला आहे गंगाखेडचा रासपचा उमेदवार उद्या निवडून आला तर तो *आमदार शिवा संघटना व रासपच्या युतीचा आमदार असेल* आणि या नंतर ज्या निवडणुका होतील पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल मार्केट कमिटी असेल या सर्व निवडणूका मध्ये किंवा ज्या शासकिय कमीट्या नियुक्त करण्यात येईल त्यात ६०% जागा ह्या रासपला आणि ४०% जागा ह्या शिवा संघटनेला गंगाखेड मतदार संघात, याच प्रमाणे देगलुर मतदार संघात शिवा संघटनेचे बालाजी बंडे हे निवडुन आल्यानंतर ६०% जागा शिवा संघटनेला आणि ४०% जागा राष्ट्रीय समाज पक्षाला अशा प्रकारचा *निर्णय* झालेला आहे.
आज गंगाखेड मतदार संघातील सुमारे पाचशे शिवा संघटनेच्या कार्यकर्त्याच्या व्यापक बैठकी मध्ये झाली आणि या बैठकीत हा प्रस्ताव सर्वान समोर मांडल्यानंतर सर्वांनी *एक मताने मंजुरी दिलेली* आहे त्यामुळे श्री धन्यकुमार शिवणकर यांचा भरलेला अर्ज माघार घेण्याचे ठरलेले आहे आणि त्याठिकाणी शिवा संघटना व रासप युतीचे उमेदवार म्हणून *रत्नाकर गुट्टे* म्हणुन लढतील आणि *देगलुर मध्ये शिवा संघटनेचे बालाजी बंडे* हे शिवा संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाचे *युतीचे उमेदवार* म्हणुनलढवतील, महाराष्ट्रात शिवा संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाची युती होऊन प्रत्येकी एक एक जागा ताकदीने लढण्याचा निर्णय झालेला आहे. हातात जे काही साधन सामुग्री होती जे उमेदवारी अर्ज भरलेले होते त्यातुन युती करून लढण्याचा निर्णय आजच्या गंगाखेड मतदार संघात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतुन झालेला आहे त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात काय निर्णय, भुमिका घ्यायची आहे त्यासाठी दि.१० आॅक्टोबर २०१९ रोजी मुंबईच्या मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण सभागृह येथील चौथा मजल्यावरील सभागृह येथे दुपारी १२.३० वाजता *महाराष्ट्रातील सर्व शिवा पदाधिका-यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे.* त्यातुन उर्वरित महाराष्ट्रात काय निर्णय घ्यायचा आहे हा सर्वांशी चर्चा करून सर्वानुमते घेतला जाईल.
परंतु या दोन मतदार सघाचा निर्णय झालेला आहे त्यानंतर लोहा-कंधार मतदार संघासाठी वेगळा काय निर्णय घ्यायचा आहे ते पुर्वी घोषित केलेल्या तारखेलाच दि. १५ आॅक्टोबर २०१९ रोजी व्यकटेश गार्डन लोहा येथे पुन्हा बैठक बोलावलेली आहे त्यात सर्वानुमते भुमिका घेतला जाणार आहे.
लोहा-कंधार मधील सर्वच उमेदवार शिवा संघटनेला सारख्याच अंतारावर आहेत त्यामुळे कोणीही निवडुन आले तरी त्याचा फरक शिवा संघटनेला पडत नाही त्यामुळे लोहा मतदार संघात नोटाला मतदान करण्याचाही निर्णय सर्वानचमते घेतला जाईल
नोटाचे शेवटचे लाल रंगाचे बटन दाबुन मतदान करणे म्हणजेच प्रा.मनोहरजी धोंडे सराना मतदान करणे होईल
या महत्त्वाच्या निर्णयासाठी मुंबई येथे बोलावलेल्या तातडिच्या बैठकित महाराष्ट्रातील शिवा संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वेळेवर आवर्जुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे एकदा निर्णय झाल्यानंतर त्यानंतर कुणालाही ऐकुन घेतले जाणार नाही किंवा बोलायला संधी दिली जाणार नाही.
त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन प्रा.मनोहर धोंडे यांनी केले आहे...
0 टिप्पण्या