💥खा.संजय जाधव यांच्या हस्ते होणार भव्य रावणाचे दहन💥
पूर्णा:येथील जूना मोंढा मैदानावर मंगळवार दि.८ आक्टोंबर रोजी संध्याकाळी ०८-०० वाजता खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते रावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने रावणाची एकावन्न फूटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून रावणदहन व भव्य आतिशबाजीची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती मुख्यसंयोजक नितिन उर्फ बंटी कदम यांनी दिली.खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते रावण दहन होणार असून यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, रामप्रसाद रणेर, संस्थापक अध्यक्ष सुधाकर खराटे, संतोष एकलारे, तहसिलदार पल्लवी टेमकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले, पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, डॉ.विनय वाघमारे, डॉ. गुलाबराव इंगोले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, नगरसेवक विमलबाई कदम, शाम कदम, राजेश भालेराव, साहेब कदम, बालाजी साखरे, राजू एकलारे, बालाजी वैद्य, प्रकाश कराळे, शहरप्रमुख मुंजाजी कदम, राजेश धूत, विशाल चितलांगे उपस्थित राहणार आहेत.
संध्याकाळी आठ वाजता प्रथम आतिषबाजी करण्यात येईल त्या नंतर रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे.अशी माहिती राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीचे मुख्य संयोजक नितिन उर्फ बंटी कदम, कार्यकारी अध्यक्ष पप्पु खंडागळे (गवळी) , जयसिंग चंदन, अध्यक्ष गोपाळ कदम, विद्यानंद तेजबंद , आकाश ठाकुर, बालाजी वाघ, संदीप हानवते, गोविंद गाढवे, राम कदम, मन्मथ स्वामी, सुशिल ठाकुर, राहुल कदम, कल्याण खाकरे, वैभव लहाने यांनी दिली.
0 टिप्पण्या