💥गंगाखेड विधानसभा मतदार संघात एका शेतकरी पुत्र वाघाने दिली भ्रष्ट उद्योगपत्याला कडवी झुंज...!💥आस्तीनच्या सापांच्या पाठबळाने धनशक्की पुढे अखेर पुन्हा एकदा जनशक्ती पराभूत ?💥


परभणी/जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्यांचा समावेश असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात याही वेळेस धनशक्तीच्या बळापुढे जनशक्ती पराभूत झाली असून एका तरुण तडफदार कर्तृत्ववान शेतकरी पुत्र असलेल्या विशाल विजयकुमार कदम या अस्सल वाघाने केवळ कर्तृत्वावर शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून कोट्यावधीची अफरातफर करुन कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या व तुरुंगातून निवडणूक लढवत असलेल्या रत्नाकर गुट्टे यांना कडवी झुंज दिली मात्र शेवटी आस्तीनच्या जहरील्या नागांच्या छुप्या पाठबळातून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे यांची १८००० मतांनी विजयी उमेदवार म्हणून नोंद झाली आणि पुन्हा एकदा धनशक्ती पुढे जनशक्ती पराभूत झाली..

राज्यात धनदांडग्यांचा मतदार संघ म्हणून गंगाखेड विधानसभेकडे लक्ष लागले होते. या ठिकाणी बहुरंगी लढत झाली. खरे तर अनेक दिग्गज याठिकाणी उभे होते.शिवसेना-भाजप महायुतीचे विशाल विजयकुमार कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आ.डॉ.मधुसुदन केंद्रे,पुर्वी दोन वेळा या मतदार संघाचे नेतृत्व केलेले मा.आ.सिताराम घनदाट,अपक्ष संतोष मुरकुटे,या दिग्गजांशी रत्नाकर गुट्टे यांनी काट्याची लढत दिली. या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात पैशाचा बोलबाला झाला.

गंगाखेडची जागा महायुतीत शिवसेनेला सुटल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या रासपनेही या ठिकाणी युती धर्माला मुठमाती कोट्यावधी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात तुरुंगात असलेल्या रत्नाकर गुट्टे यांना या ठिकाणावरून पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला होता.

परभणीच्या जिल्हा कारागृहात सध्या कर्ज फसवणुक प्रकरणात अडकलेले रत्नाकर गुट्टेंना त्यांच्या आप्तनातेवाईकांनी तसेच जावयांनी प्रयत्नांचा पराकाष्टा केली

गुट्टे तुरुगात असतांनाही त्यांच्या माघारी त्यांच्या नातेवाईकांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.रत्नाकर गुट्टे यांना विजयी करण्यासाठी समर्थकांनी प्रयत्न केले.अखेर अटीतटीच्या लढतीत रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा 18 हजार मतांनी पराभव केला.परिस्थिती विशाल कदम यांना निवडून येण्या इतपत मजबूत असतांनाही शेवटी आस्तीनच्या सापांचे मिळालेले पाठबळ आणी धनबळाने गुट्टेंनी बाजी मारली त्यामुळे विशाल कदम या कर्तृत्ववान तरुण तडफदार उमेदवाराला  पराभव स्वीकारावा लागला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या