💥गंगाखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा डॉ.मधुसुदन केंद्रेंना उमेदवारी...!



💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी जाहिर केली २० उमेदवारांची यादी💥

मुंबई/राज्यातील विधानसभा निवडणूकी साठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज गुरवार दि.०३ आक्कोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या  २० उमेदवारांची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली असून यामध्ये गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ.केंद्रे यांच्यासह ४ विद्यमान आमदारांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.
मागील २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकी मध्ये गंगाखेड विधानसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.मधुसूदन केंद्रे हे अल्पशा मताने निवडून आले होते.परंतु सदरील मतदार संघातील मतदारांचा त्यांनी भ्रमनिराश करीत या मतदार संघात म्हणावा तसा विकास केला नसल्यामुळे यावेळी पक्ष श्रेष्ठीकडून योग्य उमेदवार मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु राष्ट्रवादी पक्षाने पुन्हा डॉ.केंद्रे यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे सदरील विधानसभा मतदार संघात रा.काँ.उमेदवार केंद्रे यांना पराभवाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.राष्ट्रवादीने काल ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये २० विद्यमान आमदारांचा समावेश होता आणि आजच्या दुसर्‍या यादीत ४ विद्यमान आमदारांचा समावेश करण्यात आला आहे तर १६ नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या