💥सच हमेशा कडवा होता हैं,मगर सच सच हीं होता हैं....?💥जनसामान्यांच्या उपकाराची जाण ठेवणारा जिल्ह्यातील एकमेव लोकप्रतिनिधी खा.संजय जाधव💥

पुर्णा तालुक्याला शेवटी दिलाच ना न्याय,पुर्णा तालुका परभणी विधानसभा मतदार संघातून तुटून गंगाखेड विधानसभा मतदार संघात जोडल्या गेल्यानंतर संपूर्ण तालुका बेवारस झाल्यागत झाला होता सर्व सामान्य जनता वेळोवेळी आपली कामे घेऊन पुर्वी या तालुक्याचे आमदार असलेल्या व आता विद्यमान खासदार असलेल्या हक्काचे लोकप्रतिनिधी खा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्याकडे जात होती अत्यंत तापड स्वभाव परंतु मनाने निर्मळ असलेल्या जिल्ह्यातील या एकमेव लोकप्रतिनिधीने प्रत्येकाला वेळोवेळी कमी जास्त प्रमाणात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

सर्वात महत्वाची आणी अभिमानाची बाब म्हणजे पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्याचा समावेश असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत या उपकाराची खरचच परतफेड करण्याची वेळ आली आहे.याची जाणीव ठेवून खा.संजय जाधव यांनी या मतदार संघातील जनतेला अगदी सहज उपलब्ध होणारा व प्रत्येकाच्या संकट समयी धावून येणारा हक्काचा लोकप्रतिनिधी मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन पुर्णा नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष व विद्यमान जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांना विनंती करुन गंगाखेड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळवून दिली.ही बाब निश्चितच अभिमानास्पद म्हणावी लागेल.शेवटी एका जनहीतवादी लोकप्रतिनिधी तसेच लढवय्या नेत्याने जनसामान्यांच्या उपकाराची परतफेड केली असे म्हणने चुकीचे ठरणार नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या