💥शहरातील अंबीका देवी मंदिर परिसरात सकाळी ९ वाजेच्या सुमारास या रॅलीला करण्यात आला शुभारंभ💥
पूर्णा/शहरात शुक्रवारी ११ रोजी शिवसेना भाजप रिपाइं शिवसंग्राम रयतक्रांती सेना महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ शहर व परिसरातील पदाधिकारी, नागरीक, व्यापारी, कार्यकर्ते यांनी शहरातून भव्य रॅली काढून प्रचाराचा श्रीगणेशा केला.
पुर्णा शहरातील अंबीका देवी मंदिर परिसरात सकाळी ९ वाजेच्या सुमारास या रॅलीला शुभारंभ करण्यात आला.गळ्यात महायुतीच्या दस्त्या , उमेदवाराचे निवडणूक चिन्ह घेऊन ही रॅली शहरातील अमृत नगर, आदर्श काॅलनी, आनंद नगर, मुख्य रस्त्यावरून शास्त्रीनगर ,महाविरनगर भागातून मुख्य बाजारपेठ ते सराफा बाजार,दत्त मंदिर महादेव मंदिर, भवानी परिसरात कुरेशी मोहल्ला अण्णासाठेनगर,ते जुना मोंढा बाजारात या रॅलीचा समारोप करताना करण्यात आला.
ही रॅली वाजत गाजत ग्रामदेवतांना श्रीफळ वाढवत पुढे जात होती दरम्यान या रॅली मार्गावरील महापुरुषांनाही अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजपच्या राजश्रीताई जामगे,प्रशांत कापसे, संतोष एकलारे, सुधाकर खराटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब जामगे,ता.अ बाळासाहेब कदम,डॉ अजय ठाकूर,विजय क-हाड,संजय अंभोरे, चंद्रकांत टाकळकर,प्रशांत कापसे,माऊली कदम,शिवसेनेचे विजयकुमार कदम, सुधाकर खराटे,उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, संतोष एकलारे,काशिनाथ काळबांडे, मुंजा कदम, नितीन (बंटी) कदम,, प्रकाशराव क-हाळे,नगरसेवक श्याम कदम व अँड राजेश भालेराव,शंकर गलांडे ,प्रमोद (राजू) एकलारे, रमेश ठाकूर, रवि कदम, विशाल चितलांगे,बाळू मुथा,राजू माने विकास वैजवाडे,विद्यानंत तेजबंद,माणीक सुर्यवंशी आदीं सह शहरातील महायुतीचे पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते शहरातील व्यापारी नागरिक स्वयंस्फुर्तीने शेकडोंनी रॅलीत सहभाग नोंदवला...
0 टिप्पण्या