💥मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर - पि.शिवशंकर
परभणी, दि. ३ :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जिल्हयात आज दि. अखेरपर्यंत एकूण ६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मतदार संघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे 95-जिंतूर -निरंक, 96-परभणी - ५, 97-गंगाखेड - १ आणि 98-पाथरी –निरंक. विधानसभा मतदारसंघात आज अखेर एकूण २७३ नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 95-जिंतूर - ४३, 96-परभणी - ८८, 97-गंगाखेड - ११२ आणि 98 – पाथरी - ३० असे आज अखेरपर्यंत एकूण २७३ नामनिर्देशनपत्राचे वितरण करण्यात आले आहे. आजअखेर पर्यंत परभणी जिल्ह्यात एकूण 38 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
-*-*-*-*-
*मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन*
*मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर*
-पी.शिवशंकर
परभणी दि.३ः- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रशासनाने संपुर्ण तयारीनिशी सज्ज असून मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा उपयोग मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी होणार आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी व्यक्त केला.
पी.शिवशंकर म्हणाले, युवा मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी विविध महाविद्यालयामध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे. यामाध्यमातून युवा मतदारांना प्रबोधन करण्यात येवून त्यांना ईव्हीएम व व्हिव्हीपॅट संबंधीत माहिती देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाकडूनही मतदान करण्याबाबत संकल्पपत्र भरुन घेण्यात येत आहेत. आजपर्यंत जवळपास 50 हजार पालकांचे संकल्पपत्र भरुन घेण्यात आले असून त्याचे वाटप करण्यात येत आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने जिल्हाभरातील भावी मतदारांना मतदारदुत म्हणून काम करण्यास प्रेरित करण्यात येत आहे.
अतिवृध्द, दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनामार्फत मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून एकही दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आकाशवाणीवर निवडणूक विषयक जनजागृती करण्यासाठी दररोज 5 ते 10 मिनिट गीतसंवाद, माहिती व मान्यवर अधिकाऱ्यांचे संदेश प्रसारित करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी पथनाट्य व कलापथकामार्फत ओवी, भारुड, कव्वाली, लोकगीत, आदिच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम करण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणूक-2019 करिता परभणी जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली असून या जिल्ह्यात प्रत्येक नागरिक व मतदार हा मतदान करेल तसेच ही मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडेल असा विश्वास आहे. असेही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यावेळी म्हणाले.
-*-*-*-*-
0 टिप्पण्या