💥पुर्णेतील रवि बिंदु यांचा रेल्वे खाली सापडुन दुर्दैवी मृत्यु..!



💥घटने संदर्भात लोहमार्ग पोलीसांत करण्यात आली अकस्मात मृत्युची नोंद 💥

पूर्णा/नांदेड-पुर्णा लोहमार्गावरील चुडावा रेल्वे स्थानका जवळ पुर्णेतील एका ५० वर्षीय ईसमाचा रेल्वेखाली सापडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
     रवि दिगंबरराव बिंदु रा.आदर्श काॅलनी पुर्णा असे त्या मयत ईसमाचे नांव आहे.नांदेड-पुर्णा लोहमार्गावरील चुडावा रेल्वे स्थानका जवळील  ३२८/५/६ कि मी अंतरावर पुर्णेच्या दिशेने बुधवारी ११ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास तिरुपतीहुन शिर्डीकडे जाणा-या साईनगर एक्सप्रेसखाली सापडून त्यांचा मृत्यु झाला अशी माहीती सदरील गाडीचे चालक यांनी पुर्णा रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली.यावरुन पुर्णा लोहमार्गाचे मो. ईकबाल आकोटकर,यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी येथिल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असुन या प्रकरणी लोहमार्ग पोलीसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.रवि बिंदु हे दि.७ सप्टेंबर रोजी नांदेड येथे दुकानावर कामास जातो म्हणून घरुन गेले होते ते घरी परतले नव्हते मागील चार दिवसांपासून बेपत्ता होते. अशी नोद पुर्णा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या