💥मुंबईत शहर उपनगरात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस,रेल्वे सेवा सुरळीत...!



💥शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम💥 

शहर आणि मुंबई उपनगरात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. आज सकाळीही पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच होती. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने सुरु आहे.मुंबईत रात्रभर पावसाने हजेरी लावली असून मुंबईत पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. किंग्ज सर्कल, माटुंगा, परळ, अंधेरीसह अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे.  मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. काल सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होती., मात्र संध्याकाळनंतर पावसाने जोर धरला आणि रात्रभर जोरदार पाऊस झालाय. आज दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी ४.५४ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या