💥पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल – इस्रो प्रमुख


💥विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटला💥

चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी शनिवारी सांगितले. लँडर बरोबर जो संपर्क तुटला त्यासाठी मिशनच्या शेवटच्या टप्प्यात चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी जबाबदार असल्याचे सिवन म्हणाले. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटला. शेवटच्या टप्प्यात योग्य पद्धतीने प्रक्रिया पार पडली नाही. त्यावेळी आमचा संपर्क तुटला असे सिवन म्हणाले. त्यांनी दूरदर्शनाला मुलाखत दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत असे सिवन यांनी मुलाखतीत सांगितले. त्यांच्या भाषणामधून आम्हाला प्रेरणा मिळाली. विज्ञान निकाल पाहत नाही पण प्रयोग चालू असतात आणि प्रयोगामधूनच निकाल मिळतात हे मोदींचे वाक्य खूप महत्वाचे होते असे सिवन म्हणाले. चांद्रयान २ चा अन्य मोहिमांवर अजिबात परिणाम होणार नाही. आम्ही अनेक प्रकल्पांवर काम करत आहोत. हा आमच्यासाठी झटका नाही. आम्ही पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या