💥नैसर्गिक शेतीमालाला जागेवरच तयार केले मार्केट...!


💥रासायनिक अंशमुक्त अन्नच पिकवायचा श्याम सोनटक्के यांचा संकल्प💥

लोहारा (जि. लातूर) येथील श्याम चंदरराव सोनटक्के यांच्या संयुक्त कुटूंबाची ९० एकर शेती आहे. पैकी ६५ एकर शेती लागवडीखाली आहे. पूर्वी हंगामी पिकांबरोबर उसाचे पीकही होते. मात्र उत्पादन समाधानकारक मिळत नव्हते. उत्पादन खर्च वाढत होता. तो कमी करण्याबरोबर रासायनिक अंशमुक्त अन्नच पिकवायचे असे सोनटक्के यांनी ठरवले. त्यानुसार वाटचाल सुरू केली. नैसर्गिक शेतीची वाटचाल लातूर येथे नैसर्गिक शेतीतील प्रशिक्षण श्याम सोनटक्के यांनी घेतले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काडसिद्धेश्वर यांच्या सेंद्रिय आश्रमातही त्यांनी ही शेती पद्धतशिकून घेतली. त्यानंतर सुरवातीला पाच एकरांत नैसर्गिक शेतीचा प्रयोग राबविला. त्याचे कारण सर्व क्षेत्रावर हा प्रयोग राबविणे जोखमीचे होते. पहिली दोन वर्षे उत्पादनात २५ टक्क्याने घट जाणवली. मात्र मिळणाऱ्या रूचकर अन्नाची गोडी वाढली. घरात कोणतेही कार्य असो घरच्या विषमुक्त अन्नाचा वापर वाढला. यातून अनेकांना अन्नाची चव चाखायला मिळाली. हळूहळू ग्राहकांकडून या मालाला मागणी वाढली. मग या पद्धतीचा विस्तार केला.स्वतः तयार केले मार्केट विक्रीसाठी कोठेही बाजारपेठेत जाण्याची गरज श्याम यांना भासत नाही. घरूनच ग्राहक शेतमाल घेऊन जातात. हंगामातच आगाऊ नोंदणी होते. देशी वाणांची चव चाखायला मिळाल्याने अनेक ग्राहक तयार केले आहेत. श्याम सोनटक्के हे ६० व्हॉटसॲप ग्रूपला जोडलेले आहेत. आपल्या पिकांचे किंवा शेतमालाचे काही सेकंदाचे व्हिडीओ तयार करून ते या ग्रूपवर अपलोड करतात. या ग्रूपमध्ये डॉक्टरवर्ग किंवा अन्य ग्राहकही आहेत. साहजिकच त्यांच्याकडून सतत मागणी येते, असे श्याम सोनटक्के म्हणाले. हुरडा पार्टीच्या हंगामात सुमारे२०० व्यक्ती श्याम सोनटक्के यांच्या शेतात ज्वारीच्या हुरड्याचा आनंद घेण्यास येतात. साहजिकच हेच ग्राहक पुढे शेतमालाची प्रसिद्धी करतात. विक्रीसाठी बाजारपेठेत जाण्याची गरजच उरलेली नसून बांधावरच मार्केट तयार केल्याचे श्याम सोनटक्के सांगतात.

नैसर्गिक शेतीचा फायदा -

 पूर्वी रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावरहोणारा ३० ते ४० टक्के खर्च आता कमी झाला आहे. जमिनीचा पोतही सुधारू लागला आहे. घरच्या घरी नैसर्गिक कीडनाशके बनवल्याने रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळता आले. कीड येण्याआधीच प्रतिबंधात्मक फवारणीहे या  शेतीचे गमक असल्याचे श्याम सांगतात.विषमुक्त माल असल्याने त्याची किंमत अव्वाच्या सव्वा न ठेवता बाजारभावापेक्षा थोडीच जास्त ठेवली आहे. किंमतीपेक्षा आरोग्यदायी अन्न हा घटक महत्त्वाचा असून, त्यामुळेच ग्राहकांचे नेटवर्क जपल्याचे ते सांगतात.

सोनटक्के यांची नैसर्गिक शेती   सध्या ६५ एकरांवर शंभर टक्के नैसर्गिक शेती भात, कांदा, लसूण, आले, तूर, हरभरा, सोयाबीन,अशी पिके घरच्या घरी जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, संजीवनी अर्क, लसूण-मिरची अर्क आदींचा वापर रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर पूर्ण बंद.  शेतीत पेरणीची वेळ महत्त्वाची असून वेळेत पेरणी केल्यास नैसर्गिक शेतीची फायदा होतो असा अनुभव. श्याम सांगतात की रासायनिक शेतीच्या पद्धतीपेक्षा नैसर्गिक शेतीत एकरी उत्पादन थोडे कमी मिळते. मात्र ते सत्त्वयुक्त व निरोगी असते. त्याला दरही चांगला मिळतो.

   - श्याम सोनटक्के - ८८३०६०१७२५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या