💥पूर्णा न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल,धनादेश अनादर प्रकरणी आरोपीची केली निर्दोष मुक्तता...!



💥ॲड्.रोहिदास निवृत्तीराव जोगदंड गौरकर यांनी खंबीरपणे मांडली आरोपीची बाजू💥

पुर्णा/येथील दिवानी व फौजदारी सत्र न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी श्याम शिरसकर यांनी आरोपी हरी डाखोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती सदर फिर्यादी मध्ये फिर्यादी यांनी हात उसनी रक्कम रुपये 3,50,000 आरोपीस दिले व त्या बदल्यात आरोपीने चेक दिला व सदर चेक अनादर झाल्याने फिर्यादी शिरसकर यांनी दिवाणी व फौजदारी न्यायालय पूर्णा येथे धनादेश अनादर प्रकरणी फिर्याद दिली  होती माननीय न्यायालयाने दोन्ही बाजूने साक्षी पुरावा व युक्तिवाद ऐकल्यानंतर सबळ पुराव्याअभावी आरोपी शिक्षक हरी डाखोरे यांची निर्दोष मुक्तता केली या विषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना डाखोरे यांनी असे सांगितले की आज मला खरा न्याय मिळाला असून न्यायपालिकेवरील विश्वास दृढ झाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आरोपीच्या बाजूने दिवाणी फौजदारी न्यायालयात येथील विधितज्ञ ॲड रोहिदास निवृत्तीराव जोगदंड गौरकर यांनी खंबीर बाजू मांडली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या