💥आंबेडकर नगर येथे श्री.विसर्जनाच्या दिवशी विशेष पथकाने धाड टाकून जप्त केला देशी दारुसाठा💥
पुर्णा/शहरासह संपूर्ण तालुक्यात अधिकृत देशी-विदेशी दारु विक्री परवाना धारक व अवैध देशी-विदेशी विक्रेत्यांच्या संगणमतातून मोठ्या प्रमाणात अवैध-विदेशी दारुची तस्करी तसेच विक्री केल्या जात असून शहरातील काही परिसरांसह ग्रामीण भागातही अवैध देशी-विदेशी दारु अड्डे चालत असून बंद काळात मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातही प्रचंड प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारुची विक्री होत असून या अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना शहर व परिसरातील अधिकृत परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानदार तसेच बिअरबार चालकांकडून मोठ्या प्रमाणात दारुचा साठा पुरवला जात आहे.
पुर्णा शहराची अतिसंवेदनशिल शहर म्हणून शासन दरबारी नोंद असून शहरात सन-उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती महोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नए याकरिता प्रशासन सतर्कतेचा भाग म्हणून अवैध देशी-विदेशी दारु विक्री विरोधात विशेष खबरदारी घेत असते परंतु यानंतर ही शहरात अवैध दारु विक्री होती कशी ? असा प्रश्न उपस्थित होणारी घटना काल गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरातील आंबेडकर नगर परिसरात घडली शहरात गणपती विसर्जन मिरवणूकींना सुरवात झाली असतांना तसेच पो.नि.सुभाषराव राठौड व संपूर्ण पोलीस प्रशासन बंदोबस्तात गुंतलेले असतांना सायं.०६-३० वाजेच्या सुमारास दस्तुरखुद्द परवाना धारक देशी दारु दुकान मालक संतोष अण्णा गौड,व व्यवस्थापक सिध्दांत मधुकर ढगे यांना ड्रायडे असतांना अवैध देशी विक्री करीत असतांना जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या विशेष पथकाने धाड टाकून ८१ सिलबंद भिंगरी देशी दारू बॉटल ज्याची किंमत ४२१२ रुपयें व देशी दारु विक्री करुन जमा झालेले ४१२० रुपयें अश्या एकूण ९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय,अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर.यांच्या मार्गदर्शनाखाली
विशेष पथकातील स.पो.निरीक्षक एच.जी.पांचाळ,पो.ह.हनुमान,सखाराम टेकुळे,जगदीश रेड्डी,पो.कॉ.श्रीकांत घनसावंत,अतुल कांदे,भोरगे
यांनी केली..
0 टिप्पण्या