💥परभणी जिल्ह्यात गणेश महोत्सव विसर्जन मिरवणूकीत डिजे वाजविण्यास बंदी...!



💥जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी काढले आदेश,डिजे वाजवल्यास होणार कठोर कारवाई💥

परभणी/जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी दि.०८ सप्टेंबर ते दि.१२ सप्टेंबर २०१९ रोजी श्री.विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत डॉल्बी सिस्टीम (डिजे) वाजवण्यास बंदी असल्याचे आदेश काडले असून उच्च न्यायालयाने डिजे वाजवण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात यावर्षी ही गणेशोत्सवात कोणत्याही ठिकाणी डॉल्बी सिस्टीमच्या धडधडाटावर प्रशासनाचा अंकूश राहणार आहे.
जिल्हाधिकारी शिवशंकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी ही माहिती दिली आहे उच्च न्यायालयाने घातलेली बंदी व ध्वनी प्रदुषणाचे कारण देत डॉल्बी सिस्टीम (डिजे) वाजण्यावर बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.ध्वनी प्रदुषणाच्या मुद्यावरून डीजे साउंड सिस्टिमला सार्वजनिक ठिकाणांवर वाजवण्यास परवानगी देणे अशक्य असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या