💥पुर्णेतील भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांतून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक ? 💥एसबीआय बँक प्रशासनाकडून बँकेत खातेदारांची २० हजार रुपयें रक्कम भरण्यास नकार ग्राहक सेवा केंद्रांची चांदी💥

पुर्णा/येथील भारतीय स्टेट बँक प्रशासन बँक ग्राहकांची २० हजार रुपयांची रक्कम बँकेतील कॕश काँटरवर भरणा करण्यास नकार देत असल्याने खातेदार बँक ग्राहकांची प्रचंड कुचंबना होत असून बँक प्रशासन रक्कम भरण्यास भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांवर पाठवत असल्यामुळे संबंधित सेवा केंद्र चालकांकडून अश्या ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केल्या जात असल्याचा प्रकार बँक खातेदारांच्या बोलण्यातून समोर येत आहे.

संबंधित सेवा केंद्र चालक खातेदार ग्राहकांकडून शेकडा १% प्रमाणे रक्कम वसूल करीत असल्याने बँक खातेदार अक्षरशः त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून बँक खातेदार ग्राहकांच्या या होणाऱ्या आर्थिक पिळवणूकी संदर्भात भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक आर.के.ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता श्री ठाकूर म्हणाले की भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रात व्यवहार करतांना बँकेच्या नियमाप्रमाणे भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना १० हजार रुपयें काढण्यास आणी २० हजार रुपयांपर्यंत रक्कमेचा भरणा करण्यास एक रुपयाहीं किंमत मोजावी लागत नाही परंतु शहरातील ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून बँक खातेदार ग्राहकांकडून मनमानी रक्कम वसूल केली जात आहे. सदरील बाब शाखा व्यवस्थापक ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी असे सांगितले की सदरील ग्राहक सेवा केंद्र बँक प्रशासनाने ग्राहकांच्या सुविधेसाठी दिलेली असून सुविधा केंद्र चालकांकडून आर्थिक पिळवणूक झाल्यास खातेदार ग्राहकांनी तक्रार करावी बँक प्रशासनकडून तात्काळ त्या ग्राहक सुविधा केंद्राची मान्यता रद्द करण्याच्या दिशेने पावल उचलण्यात येतील असेही ठाकूर म्हणाले शहरासह तालुक्यात भारतीय स्टेट बँकेची एकून १३ ग्राहक सुविधा केंद्र असून यात पुर्णा शहरात एकून आठ ग्राहक सेवा केंद्र असून ग्रामीन भागात एकून पाच ग्राहक सेवा केंद्रांना भारतीय स्टेट बँक प्रशासनाने मान्यता दिली आहे.संबंधित ग्राहक सेवा केंद्रात बँक खातेदार ग्राहकांची होणारी आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबवण्याची मागणी खातेदार ग्राहक वर्गातून होतांना दिसत आहे भारतीय स्टेट बँक प्रशासन बचत खातेदार ग्राहकांच्या खात्यात दोन ते विस हजार रुपयांचा भरणा बँकेतील कॕश कॉन्टरवर स्विकारत नाही याशिवाय एटीएम सुविधाही आठवड्यातून चार ते पाच दिवस बंद राहत असल्याने त्या बंद अवस्थेतील एटीएम कडे ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने मजबूर झालेल्या खातेदार ग्राहकांना नाईलाजास्तव ग्राहक सेवा केंद्रांकडे जावे लागत आहे.त्यामुळे खातेदार ग्राहकांमध्ये अशी चर्चा आहे की बँक प्रशासन व ग्राहक सुविधा केंद्रांच्या संगणमतातूनच खातेदार ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या