💥मौ.खुजडा येथील जि.प.शाळेत पो.नि.सुभाषराव राठौड यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन...!



💥पो.नि.सुभाषराव राठौड यांचा गावकऱ्यांनी केला सत्कार💥

पुर्णा/येथील पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पो.नि.सुभाषराव राठौड यांनी आज शुक्रवार दि.१६ अॉगष्ट रोजी सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास गावातील जनता व पोलीस प्रशासनात सुसंवाद साधावा या उद्देशाने मौ.खुजडा या गावास भेट दिली यावेळी जिल्हा परिषद शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणावर मार्गदर्शन केले तर यावेळी उपस्थित गावकऱ्यांना कायदा व सुव्यस्था या संदर्भात मार्गदर्शन केले.


यावेळी मौ.खुजडा येथील समस्त गावकरी मंडळींच्या वतीने पो.नि.श्री.सुभाषराव राठौड यांचा शाल श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत कुऱ्हे,गावचे पोलीस पाटील रमाकांत भालेराव,मा.पो.पा.बालासाहेब कुऱ्हे तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थीनीं-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या