💥संगणक परिचालकांना आय.टी.महामंडळा मार्फत तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी...!


💥महाराष्टात संगणक परिचालक आॅफलाईन जान्याच्या तयारीत💥

फुलचंद भगत

मंगरुळपीर:- संगणक परिचालकांना आय टी महामंडळामार्फत तात्काळ नियुक्ती देवुन थकीत मानधन अदा करावे याची मागणी असुन शासनाने न्याय न दिल्यास आगामी काही दिवसात कामबंद आंदोलन करन्याचा निर्णय संघटनेमार्फत घेतल्याचे समजते.
                   संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावा गावात डिजिटल इंडिया चे काम ऑनलाइन करुन शासनाला नं १ वर पुरस्कार मिळवुन देणारे ग्राम पंचायत केंद्र चालक मात्र १०/१२ महिन्यापासून पगारा विना बेहाल झाला आहेत अशी माहीती मिळाली  तसेच त्यांचा पारिवारिक जीवनाचा गाडा मात्र स्तब्ध झाला असल्याचीही व्यथा संगणक परिचालकांनी बोलुन दाखवली.२६ डिसेंबर रोजी अधिवेशन चालू असताना केंद्र चालकाने मुंबई अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला तेव्हा शासनाने आय. टी महामंडळत सामावुन घेण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबद्दल   या विषयावर मार्ग काढत आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही नसल्याचेही समजते.
त्याकरिता लवकरच केंद्र चालक दिर्घ काळ काम बंद आंदोलन करणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शासनाने ग्रामपंचायत सेवा स्थगित न करता केंद्र चालक यांना न्याय द्यावा असे अशी मागणी होत आहे.मागणी पुर्ण न झाल्यास सबंध महाराष्ट्रात २१५०० केंद्रचालक ऑफलाईन जाण्यासाठी सज्ज असल्याची माहीती संघटनेकडुन प्राप्त झाली आहे.


 राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामाहून घेऊ असे  मागील 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते.हा निर्णय येत्या 10 दिवसात बैठक घेऊन देतो म्हणून सांगितले परंतु 8 महिने झाले तरी ना बैठक घेतली ना निर्णय दिला,या निर्णयासाठी राज्य संघटनेने अनेक वेळा सर्व अधिकारी,मा.ग्रामविकासमंत्री महोदय तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला परंतु शासनाने आपला निर्णय न दिल्यामुळे आम्ही कामबंद आंदोलन करू

ज्ञानेश्वर मुखमाले
मंगरूळपीर ता. अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना


एकीकडे शासन डिजिटल इंडियाची घोषणा करते आणी दुसरीकडे संगणक परिचालकांच्या मागन्याकडे दुर्लक्ष,अशाने डिजिटल क्षेञात कशी प्रगती होईल?शासनाने स्मार्ट ग्राम करीता संगणक परिचालकांना आयटी महामंडळात सामावुन घ्यायलाच हवे.

ए.पी.पातुरकर
सदस्या,संगणक परिचालक संघटना,मंगरुळपीर

फुलचंद भगत
जिल्हा प्रतिनीधी,वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या