💥भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत....!




💥ऐतिहासिक निर्णयाचा चिखली शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोश साजरा💥

✍ मोहन चौकेकर

चिखली : भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील वादग्रस्त ठरलेले ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज घेतला. या ऐतिहासिक निर्णयाचे चिखली शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. आज सोमवार, दि. ५ आॅगस्ट रोजी फटाके फोडून आणि मिठाई वाटून छत्रपती शिवाजी महाराज  व हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ आनंद व्यक्त करण्यात आला. जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्या प्रमुख  उपस्थितीत यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी साडे नऊ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयाला संसदेत देखील बहुमताने मंजूरी मिळाली. मोदी सरकारने उचललेल्या या खंबीर पावलाचे देशभरात स्वागत झाले. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेशअप्पा खबुतरे यांनी " काश्मीरसाठी बलिदान देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न आज साकार झाले " असे प्रतिपादन केले. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशाची एकात्मता व अखंडता कायम राहण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले पाटील, नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे, स्नेहलताताई खबुतरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रतापसिंह राजपुत, रामदास देव्हडे, शे.अनिस शे बुडन,नगरसेवक अनुप महाजन, सुदर्शन खरात, गोपाल देव्हडे , नामु गुरुदासाणी, विजय नकवाल, गोविंद देव्हडे, पंचायत समिती सदस्य संदीप उगले , गोविंद गिनोडे, दिलीप डागा, अंकुशराव पडघान, कुणाल बोंद्रे ,श्रीरंग पितळे, महेश लोणकर, सचिन कोकाटे, चक्रधर लांडे, विकी हरपळे, साहेबराव पाटील ,उद्धव महाराज जवंजाळ, प्रल्हाद भालेकर, कय्युम टेलर, प्रकाश गुंजकर, अँड संजीव सदार, राजेंद्र खरात, किसनराव मांडगवडे, सुदर्शन भालेराव, सुनील लाहोटी, संदीप गिरी, गजानन कुळकर्णी, सतीश खबुतरे, बबनराव सुरडकर, अकबर सेठ आतार, दत्ता इंगळे, सलीम परवेज, अमित खबुतरे, रवी महाजन, विश्वास सावन, अनंता सोळंकी, विश्वनाथ सोळंकी, शेख गुड्डु , सलीम शेख, इम्रान शहा ,आदिल शहा, शेख मोहसीन, सोहील शहा, शेख अहमद, शेख अलील, सोहेल शेख, उम्मेद शहा ,मोसिन शेख, सोहेल शेख आदी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

✍ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या