💥अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्यासंदर्भातील चर्चेला उत्तर देताना राज्यसभेत सांगितले💥
✍ मोहन चौकेकर
काश्मीर कायमस्वरुपी केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाली. योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु असे अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्यासंदर्भातील चर्चेला उत्तर देताना राज्यसभेत सांगितले. जम्मू-काश्मीर भारताचं मुकूट मणी आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
मतांच्या राजकारणातून बाहेर येऊन काश्मीरमधली परिस्थिती सामान्य बनवण्यासाठी प्रयत्न करु. काश्मीरमधला दहशतवाद संपवून काश्मीरला हसतं-खेळतं राज्य बनवायचं आहे. दल लेकमध्ये लोकांना मुक्तपणे विहार करता आला पाहिजे अशी परिस्थिती काश्मीरमध्ये निर्माण करायची आहे असे अमित शाह संसदेत म्हणाले.
अमित शाह यांच्या भाषणातील मुद्दे
- मतांच्या राजकारणातून बाहेर येऊन काश्मीरमधील परिस्थिती सामान्य बनवण्यासाठी प्रयत्न करु.
- मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू.
- परिस्थिती सामान्य झाली. योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु.
- मतपेटीच्या राजकारणापलीकडे जाऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती. ती जिगर हवी होती. मोदींनी ती दाखवली. राजकीय इच्छाशक्तीमुळे हा निर्णय होऊ शकला.
- कलम ३७० असेपर्यंत काश्मीरमधून दहशतवाद संपू शकत नाही.
- कलम ३७० तात्पुरतं आहे हे सर्वांना मान्य आहे. तात्पुरता शब्द ७० वर्ष कसा चालू शकतो.
- जम्मू-काश्मीरच डील पंडित नेहरुंनी केलं. सरदार पटेलांनी केलं नाही. सरदार पटेलांनी जी राज्ये भारतात विलीन केली तिथे कलम ३७० नाही.
- कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यामध्ये जम्मू-काश्मीरचे भले आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग बनेल.
- सरकार कायदे सरकार चालवण्यासाठी बनवत नाही. लोकांच्या भल्यासाठी कायदे बनवले जातात.
- कलम ३७० मुळे उद्योग व्यवसाय काश्मीरमध्ये येऊ शकत नाहीत.
- कलम हटवल्यामुळे उद्योग येतील. रोजगार वाढू शकतात.
- ३७० कलमामुळे मुळे भ्रष्टाचार वाढला. भ्रष्टाचाराने टोक गाठले.
- ३७० कलमामुळे काश्मीरमध्ये आरोग्यसुविधा नाहीत.
- ३७० मुळे विकास नाही, महिला विरोधी कलम आहे.
- शिक्षणासाठी काश्मीरच्या मुलांना देशभरात जावे लागते.
- दहशतवादाचे मूळ कलम ३७० आहे.
- काश्मीरमध्ये सर्वच मुस्लिम नाहीत अन्य धर्माचे सुद्धा लोक राहतात.
- २००४ ते २०१९ दरम्यान २ लाख ७७ हजार कोटी रुपये जम्मू-काश्मीरला दिले. पण त्याचा उपयोग झाला नाही...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या