💥धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या झाकीर नाईकच्या चिथावणीखोर भाषणांवर मलेशियात बंदी...!💥सामाजिक सलोखा कायमराहावा आणि देशाच्या सुरक्षेच्या हिताच्या दृष्टीने ही कारवाई केली आहे💥

गेल्या तीन वर्षापासून मलेशियात रहात असलेला मुस्लिम धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक याच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या आणि चिथावणीखोर भाषणांची मलेशिया सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मलेशिया सरकारने झाकीर नाईक याच्या भाषणांवर सर्व राज्यांत बंदी घातली आहे. याबाबत आदेश जारी केला आहे. सामाजिक सलोखा कायमराहावा आणि देशाच्या सुरक्षेच्या हिताच्या दृष्टीने ही कारवाई केली आहे, असे वृत्त मलेशियातील मीडियांनी दिले आहे.झाकीर नाईक याच्या भाषणांवर बंदी घातल्याचा आदेश सर्व पोलिस स्थानकांना पाठवून देण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. झाकीर नाईक याच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या भाषणांमुळे मलेशिया सरकार नाराज आहे. याप्रकरणी पोलिस नाईक आणि अन्य काही लोकांची चौकशी करणार आहे. धार्मिक भावना भडकावण्यासाठी खोटा प्रचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मलेशियामधील हिंदूंना भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांपेक्षा १०० पट जास्त हक्क आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य नाईक यांनी केले होते. या त्याच्या वक्तव्याची मलेशिया सरकारने गंभीरदखल घेतली आहे. मलेशिया दंड संहितेच्या कलम ५०४अतंर्गत कोणत्याही समुदायाला कमी लेखल्यास कारवाईची तरतूद आहे. झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात द्यावे, अशीमागणी मलेशियाचे मानव संसाधन विकासमंत्री एम. कुलसेगरन यांनी याआधीच केली आहे. झाकीर तीन वर्षांपासून मलेशियात राहत असून, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या