💥राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारने अध्यादेश काढून ओबीसी समाजावर अन्याय केला💥
परळी वैजनाथ/1 जुलै रोजी राज्यपालाच्या सहीने सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कमी करण्याचा अध्यादेश काढला तो अध्यादेश म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे म्हणून ओबीसी समाजातील सर्व जातींनी आता तरी जागे व्हावे या सरकारने आपला गळा घोटला आहे अशी तिखट प्रतिक्रिया ओ. बी .सी. नेते तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी दिली.
राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारने अध्यादेश काढून ओबीसी समाजावर अन्याय केला आहे ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी करण्याचा घाट सरकारने घातला असून हे म्हणजे ओबीसींना उद्ध्वस्त करण्याचे मोठे षड्यंत्र आहे म्हणून हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी ओबीसी समाजातील सर्व जातींनी एकत्र येऊन जन आंदोलन उभारून ह्या अध्यादेशाचा प्रखरपणे विरोध केला पाहिजे या सरकारची ही राक्षसी प्रवृत्ती म्हणून पाडण्यासाठी ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे व आपला हक्क मिळवला पाहिजे असे प्रा टी पी मुंडे सर म्हणाले.
ओबीसींना मिळत असलेले 27 टक्के राजकीय आरक्षण सरकारने 31 जुलै च्या अध्यादेशाद्वारे कमी केले आहे जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आरक्षण लागू होते परंतु या अध्यादेशाद्वारे या आरक्षणाला धक्का लागला आहे ओबीसी समाजाला मिळालेला हक्क सरकारने हिरावून घेतला आहे हा हक्क मिळवायचा असेल तर ओबीसी समाजातील सर्व जातीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे केले पाहिजे.
सध्या देशामध्ये 52 टक्के एवढा मोठा ओबीसी समाज आहे ओबीसी समाजामध्ये एकूण 350 जातींचा समावेश होतो परंतु 52 टक्के प्रमाणे ओबीसींना त्यांच्या शैक्षणिक, नौकरी व राजकीय सवलती मिळत नाहीत म्हणून सरकारने ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करावी अशी मागणी ओबीसी समाजातील नेत्यांची असून सुद्धा त्यांना 52 % प्रमाणे सवलती मिळत नाहीत ही खेदाची बाब आहे म्हणून या सर्व बाबीचा विचार करता ओबीसी समाजातील जातीने रस्त्यावर एकत्र येऊन सरकारच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभे करून हा अध्यादेश रद्द केला पाहिजे व आपले हक्क मिळवले पाहिजेत विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींचे आरक्षण कमी केल असून यापुढे शैक्षणिक व नोकरीमध्ये सुद्धा हे सरकार आरक्षण कमी करेल या घटनेचा जाहीर निषेध करून चला रस्त्यावर उतरुया जन आंदोलन उभे करूया असे आवाहन प्रा टी पी मुंडे सर यांनी केले...
0 टिप्पण्या