💥अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर धनज पोलिसांची कारवाई....!💥अवैध रित्या नदी मधील रेती उपास करुन रेती चोरट्या मार्गाने विक्री केल्या जात होती💥

वाशिम- जिल्ह्यातील धनज पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यापासून अवैध रित्या नदी मधील रेती उपास करुन रेती चोरट्या मार्गाने विक्री केल्या जात होती .
या बाबत धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार लिलाधर तसरे यांना गुप्त माहिती मिळाली .ठाणेदार तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय विजय राठोड जमादार कडू  जमादार राहुल वानखडे पोलीस शिपाई रवी राठोड सुनील वाणी यांनी सापळा रचून शिसोली  येथील नदी मधून रात्री नऊ च्या दरम्यान अवैध रित्या रेतीचा उपसा करुन वाहतूक करणारे वाहन पकडण्यात धनज पोलिसांना यश मिळाले असून ट्र्क्ट्रर क्रमांक एम .एच .२७ यू ४८०९ ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई सुरू आहे .

फुलचंद भगत
वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या