💥आकाशातून पडला गूढ दगड,चुंबकाला करतो आकर्षित....!



💥जिल्हाधिकारी कपिल अशोक यांनी हा काळा दगड आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे💥


बिहारमध्ये मधुबनीच्या लौकही येथे एका शेतात आकाशातून एक दगड कोसळला. त्यावेळी शेतकरी तिथे काम करीत होते. हा दगड कोसळताच त्या जागेतून धूर बाहेर येऊ लागला. शेतकर्यांनी ही माहिती प्रशासनाला कळवली. त्यावेळी अधिकार्यांनी येऊन हा दगड तपासला व ते दगड घेऊन गेले. ही एक उल्का असावी, असे म्हटले जात असून तिला लोहचुंबकही चिकटते. स्थानिक जिल्हाधिकारी कपिल अशोक यांनी सांगितले की, हा काळा दगड आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. सध्या तो जिल्हा कोषागारात ठेवण्यात आला आहे. अहमदाबाद किंवा ‘इस्रो’कडे तसेच बिहार सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे तो पाठवण्याचे पर्याय समोर आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, हा दगड बिहार संग्रहालयातही ठेवला जाईल. तिथे लोकांना हा आकाशातून पडलेला मोठा दगड पाहता येईल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या