💥पुर्णेतील ३० लाखांच्या ठिबक सिंचन घोटाळ्यातील आरोपींना ६ दिवसाची पोलीस कोठडी..!


💥तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावावरील ३० लाख रुपयांच्या अनुदानाची भ्रष्ट कृषी सहाय्यकाने लावली वाट💥

पुर्णा/शेतकऱ्यांच्या नावाने बँकेत बोगस कागदपत्रांच्या आधारे खाते उघडून परस्पर अनुदान उचलणाऱ्या ऋषी सहाय्यकासह अन्य एकास पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली सखौल चौकशीअंती पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकातील सहकारी कर्मचाऱ्यांनी काल शनिवार दि.२७ जुलै २०१९ रोजी अटक केली होती.
तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन करिता देण्यात आलेले तब्बल ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर रित्या उचलून अपहार प्रकरणी दाखल गुरनं.९०/१८ कलम ४२०,४६७,४६८,४७१,२२० (ब) ठिबक सिंचन अनुदान घोटाळा प्रकरणातील आरोपी कृषी सहाय्यक शाम यसमोड,हरीष वंजे यांना सन्माननीय न्यायालया समोर हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने दोन्हीं आरोपींना दि.०३ अॉगस्ट २०१९ पर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौजे लोखंडे पिंपळा येथिल शेतकरी सुर्यभान गंगाधर लोखंडे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन संचाकरीता पुर्णा कृषी कार्यालया मार्फत कोणताही अर्ज केला नव्हता.परंतू त्यांच्या नावे कोणीतरी बोगस कागदपत्रे तयार करून संच व त्यावरील मिळणारे २४ हजार ९८० रुपये अनुदान परस्पर  उचलून अपहार  केल्याचे उघडकीस आले याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जा नंतर तालुका कृषी अधिकारी खुपसे यांच्या तक्रारी वरून पुर्णा पोलीस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास अत्यंत काटेकोरपणे करीत पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार यांनी या घटनेतील आरोपी कृषी सहाय्यक शाम यसमोड,हरीष वंजे यांना तात्काळ अटक करुन बेड्या ठोकल्यानंतर सदरील ठिबक सिंचन योजनेतील तब्बल ३० रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून संबंधित आरोपींनी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन माध्यमातील ठिबक सिंचन योजनेत संपूर्णपणे वाट लावल्याचे उघडकीस आले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या