💥चिखलीतील वेदांत ज्वेलर्समध्ये भरदिवसा ८ लाख ७० हजाराची धाडसी चोरी...!



💥घटनेतील ३ चोरटे सीसीटीव्हीत कैद💥



 ✍ मोहन चौकेकर             
                                                                          चिखली :  चिखली शहरातील राजा टाँवर भागातील सराफा बाजारात असलेल्या वेदांत ज्वेलर्स या दुकानात अज्ञात ३ चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून ८  लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केल्याची घटना २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडली.  या घटनेतील चोरटे  ३ चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे .भरदिवसा हि घटना घडलेल्याने सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन सोन्या-चांदीचे व्यापारी मध्ये एकच घबराट उडाली आहे .यापूर्वी देखील सोन्या चांदीच्या अनेक  दुकानात चोरी  घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.                              सराफा बाजारातील वेदांत ज्वेलर्सचे  मालक  अशोक बाळाजी दराडे (५०) आज सकाळी दहा वाजता आपले दुकान उघडण्यासाठी आले . सुरवातीला त्यांनी दुकानाचे छोटे शटर उघडून  दुकानात प्रवेश केला व आपल्या जवळ असलेली पिशवी त्यांनी काऊंटर ठेवली व कुलूप व किल्ली ठेण्यासाठी पाठीमागे गेले  या संधीचा फायदा घेऊन  ३ अज्ञात चोरटे आत आले व त्यांनी तात्काळ काउंटरवर ठेवलेली पिशवी उचलून दुचाकीवरून   पोबारा केला .अशोक डहाळे यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.मात्र ही घटना  सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असल्याचे समजते. चिखली पोलिसांनी अशोक डहाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
या पिशवीमध्ये साडेसात लाख किंमतीचे  २५० ग्रँम  सोने , ४० हजार किमतीची १ किलो चांदी , ८० हजार रुपये रोख असा एकुण ८ लाख ७० हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे शहरातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यामधे  भीती  पसरली असुन सर्व व्यापारऱ्यामध्ये घबराट  नीर्मान झाली आहे. घटनेचा पुढील तपास चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक हुलगे करीत आहेत....


✍ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. वर दुकानदाराचे आडनांव दराडे लिहीले तर खाली डहाळे लिहीले.नक्की काय आडनांव आहे ह्याचा खुलासा व्हावा.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा