💥कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राहुल गांधींनी केला आरोप💥
काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले आहे. दरम्यान, कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर सुरू आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधीयांनी केली आहे. कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी या प्रकरणात भाजपाकडून सुरू असलेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली. ''कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर सुरू आहे. याआधी पूर्वोत्तर भारतामध्येही त्यांनी याचप्रकारे सत्तांतर घडवून आणल्याचे आपण पाहिले आहे.'' असे राहुल गांधी म्हणाले....
0 टिप्पण्या