💥काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षपदासाठी बंद लिफाफ्यात नावं मागवली...!


💥बंद लिफाफ्यात नावं देण्याच्या सूचना महासचिवांना देण्यात आल्या आहेत💥


 ✍ मोहन चौकेकर

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा तरुण असावा असं अनेकांचं मत आहे तर अनेकजण ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यावर ठाम आहेत. अध्यक्षपदासाठी काही नावं पुढं येत असली तरी नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी बंद लिफाफ्यात नावं देण्याच्या सूचना महासचिवांना देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे महासचिव  के सी वेणुगोपाल यांनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांना अध्यक्षपदासाठी चार-चार नावं बंद लिफाफ्यात द्यावीत अशा सूचना सर्व महासचिवांना दिल्या आहेत.  महासचिवांकडून आलेल्या या नावानंतर यावर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांची मत देखील विचारात घेतली जातील.

या सूचनेनंतर सर्व महासचिवांनी या नव्या फॉर्म्युल्याअंतर्गत नावं पाठवायला सुरुवात केली आहे. सर्व महासचिवांकडून नावं आल्यानंतर  केसी वेणुगोपाल हे यामधील सर्वात लोकप्रिय चार नावं कमिटीला कळवणार आहेत.  त्यानंतर वर्किंग कमिटीचे सदस्य यावर चर्चा करणार आहेत...

✍ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या